Maharashtra Politics: गणपत गायकवाडांच्या पाठीशी भाजप ठाम; मंजूर केला 'हा' ठराव

Ganpat Gaikwad: मलंगगड परिसरात भाजप पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक
Maharashtra Politics: गणपत गायकवाडांच्या पाठीशी भाजप ठाम; मंजूर केला 'हा' ठराव
Updated on

Maharashtra Politics: कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड हे गोळीबार प्रकरणात अटक आहेत. या प्रकरणामुळे भाजप आणि शिंदे गटातील वाद उफाळून आला आहे.

Maharashtra Politics: गणपत गायकवाडांच्या पाठीशी भाजप ठाम; मंजूर केला 'हा' ठराव
Maharashtra Politics: राज्यात NCP विरुद्ध NCP, सेना विरुद्ध सेना; भाजपला कशी होणार मदत?

गुरुवारी रात्री नेवाळीत भाजप कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील मलंगगड मंडळाची गुप्त बैठक पार पडली. या बैठकीत ठराव घेऊन भाजपने आमदार गायकवाड यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. या बैठकीचे फोटो समाज माध्यमातून व्हायरल झाले आहेत.

कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगड मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या द्वारलीतील जमिनीवरून भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गट महेश गायकवाड यांच्यात वाद झाला.

या वादातून हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गायकवाड यांनी महेश यांच्यावर गोळी झाडली आहे. गोळीबारानंतर भाजपकडून कोणत्याही प्रकारची भूमिका हि स्पष्ट केली जात नव्हती. कोणतेही भाजपचे पदाधिकारी समोर देखील येण्यास तयार नव्हते. मात्र आता भाजप श्री मलंगगड मंडळाने गुरुवारी रात्री नेवाळीत गुप्त बैठक घेत आमदार गायकवाड यांना पाठिंबा दिला आहे.

Maharashtra Politics: गणपत गायकवाडांच्या पाठीशी भाजप ठाम; मंजूर केला 'हा' ठराव
Maharashtra Politics : ठाकरेंनंतर शरद पवारांनीही गमावला पक्ष... राज्यात राजकारणात काय फरक पडणार?

या बैठकित श्रीमलंग मंडळातून खासदारांच्या मनमानी कारभारा विरोधात वरिष्ठांकडे तक्रार करण्याचे ठरले आहे. भाजप लवकरच आपली ठोस भूमिका मांडणार आहे. वरिष्ठ पातळीवर तशा हालचाली देखील सुरू आहेत.

शिवसेनेतील नेतृत्वावर नाराजी असून स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या वर्तणुकीविषयी त्यांच्याकडे तक्रार केल्यानंतर देखील त्याची दखल घेतली जात नसल्याने ही नाराजी असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Maharashtra Politics: गणपत गायकवाडांच्या पाठीशी भाजप ठाम; मंजूर केला 'हा' ठराव
Maharashtra Politics: किमान समान कार्यक्रम पुढे हलेना; मविआची पुढची बैठक केव्हा?

वाचा संर्पुण ठराव

या बैठकीमध्ये असे ठराव करण्यात आले की, खासदार श्रीकांत शिंदे यांचा आमदारांच्या पाठपुराव्याने मंजूर निधीत, जिल्हा परीषद सदस्य निधीत, ग्रामपंचायत स्तरावरील निधीत ,जन्सुविधा, नागरी सुविधा या निधीत सुद्धा वाढता हस्तक्षेप. विकास कामांच्या पाठपुरावा करुन मंजुर कामांच्या ठिकाणी श्रेय घेण्यासाठी पाट्या लावणे. तसेच शिवसेने चे पदाधिकारी हे लोकप्रतिनिधी च्या पाठपुराव्याने मंजुर झालेल्या कामांचे भूमिपूजन किंवा लोकार्पण श्रेय घेण्यासाठी अगोदरच भूमिपूजन करत होते .

या गोष्टीमुळे आमच्या श्रीमलंग मंडळातून खासदारांच्या मनमानी कारभारा विरोधात वरिष्ठांकडे तक्रार करण्याचे ठरले. ग्रामीण कार्यकर्ते वेळोवेळी या बाबत वरिष्ठान कडे तक्रार करत होते.आमदार गणपत शेट गायकवाड यांनी जीं कृती केली ती करण्याअगोदर त्यांना सुपर मुखमंत्री श्रीकांत शिंदे यांचा जो त्रास होता त्याची हि उस्फूर्त प्रतिक्रिया गोळीबाराच्या रूपाने बाहेर आली आणि म्हणूण आमदार गणपत शेट गायकवाड यांच्या पाठीशी खंबीरपणे श्री मलंग परिसरातील सर्व भाजपा पदाधिकारी ठामपणे उभे राहतील

Maharashtra Politics: गणपत गायकवाडांच्या पाठीशी भाजप ठाम; मंजूर केला 'हा' ठराव
Maharashtra Politics : 'गुंड दरोडेखोरांनी ढापलं सरकार'; ठाकरे गटाकडून थेट फोटो छापत CM शिंदे, अजित पवारांवर जहरी टीका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.