Maharashtra Politics: ''महाराष्ट्राची अधोगती थांबवायची असेल तर, गद्दारांना गाडून...'' आव्हाड नेमकं काय म्हणाले?

गद्दारांविरुद्ध आव्हाडांचा हुंकार; महाराष्ट्र महोत्सवात आक्रमक भाषण | jitendra avad was speaking at the Maharashtra festival organized by Shiv Sena thane
jitendra avadh
jitendra avadh saka
Updated on

महाराष्ट्र हे गुंडाराष्ट्र झाले आहे. महाराष्ट्राची ही अधोगती थांबवायची असेल तर, गद्दारांना गाडून टाका, असे मत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. तसेच महाराष्ट्र वाचवायचा असेल तर, मतदान विचार करुन करा असे देखील त्यांनी सांगितले.

ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिवसेना ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुख व वैष्णवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेश मणेरा यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र महोत्सवात बोलत होते.

jitendra avadh
Maharashtra Politics: गणपत गायकवाडांच्या पाठीशी भाजप ठाम; मंजूर केला 'हा' ठराव

नरेश मणेरा हा माझा जुना मित्र आहे. पण मी उपस्थित जनतेसमोर सांगतो. मी आज त्यांच्याकडून पुष्पगुच्छ घेऊ शकत नाही. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुण्यामध्ये भयावह हल्ला झाला. पोलीस आजुबाजुला असताना निखिल वागळे यांना मारण्यात आले. त्यांची गाडी फोडण्यात आली. अभिषेक घोसाळकर यांना गोळ्या मारण्यात आल्या.

महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जायचे आता महाराष्ट्र हे गुंडाराष्ट्र म्हणून ओळखले जावू लागले आहे. जनता जोपर्यंत उद्रेक करत नाही, तोपर्यंत हे घटनाबाह्य सरकार असेच चालू राहील. हे वर्ष निवडणुकांच वर्ष आहे. काम होतच राहतात, पाणी येतच राहील, लाईट लागतच राहील, राजकारणी राजकारण करतच राहतील पण जनतेने काय करायच आहे ? याचा विचार जनतेने करायला हवा.

jitendra avadh
Maharashtra Politics: राज्यात NCP विरुद्ध NCP, सेना विरुद्ध सेना; भाजपला कशी होणार मदत?

हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा आहे, हा महाराष्ट्र एस.एम. जोशी यांच्या विचारांचा आहे. शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार सांगणारा आहे. या महाराष्ट्रात जर असे होत असेल तर ती तुम्हाला आणि आम्हाला दोघांनाही लाजिरवाणी अशी गोष्ट आहे.

शेवटी मतदार निवडून देत असतात, त्या मतदारांना निर्णय घ्यावा लागेल, की महाराष्ट्र हातात राहू द्यायचा की, महाराष्ट्राची अशी अधोगती चालू ठेवायची. जर तुम्हाला ती थांबवायची असेल तर निष्ठावान, नरेश मणेरा यांच्यासारख्या माणसाच्या मागे उभे रहा, नाहीतर गद्दारांना मतदान करा असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

jitendra avadh
Maharashtra Politics: किमान समान कार्यक्रम पुढे हलेना; मविआची पुढची बैठक केव्हा?

नरेश मणेरा यांना विधानसभेत पाठवा - खा. संजय राऊत

महाराष्ट्र महोत्सवात गाण्याचा उत्तम कार्यक्रम सुरु असताना या कार्यक्रमाची लय बिघडून मला भाषण करायला बोलावले. हे बरोबर नाही, आमच्या सगळ्या भगिनी शिट्या मारत आहे, हीच खरी शिवसेना आहे. शिवसेना ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुख नरेश मणेरा यांचे खास कौतुक यासाठी करावे की, नरेश मणेरा हे सतत १२ वर्ष शिवसेना महाराष्ट्र महोत्सव हा भव्यदिव्य कार्यक्रम येथे आयोजित करत आले आहेत.

विशेषतः गेल्या दोन वर्षांत नरेश मणेरा यांनी जास्तच जोर मारलेला आहे. या शिवसेनेच्या महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजक असलेल्या नरेश मणेरा यांना आपल्याला विधानसभेत पाठवायचा आहे. राजन विचारे ही आपली जबाबदारी आहे. येथे उपस्थित या सगळ्यांचीही ही जबाबदारी असल्याचे संजय राउत यांनी सांगितले.

jitendra avadh
Maharashtra Politics: राज्याच्या कानाकोपऱ्यातून अयोध्येकडे निघाल्या भाजपच्या ३८ आस्था गाड्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.