Corona Variant JN.1 : चिंता वाढली! राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा शिरकाव; ‘जेएन.१’चा देशातील दुसरा रुग्ण सिंधुदुर्गमध्ये

कोरोनाच्या प्रकारातील ‘जेएन.१’ या नव्या उपप्रकाराचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण सिंधुदुर्गमध्ये आढळला आहे.
Maharashtra reports first case of Corona Variant  JN.1 in Sindhudurg latest Corona updates marathi news
Maharashtra reports first case of Corona Variant JN.1 in Sindhudurg latest Corona updates marathi news
Updated on

मुंबई : कोरोनाच्या प्रकारातील ‘जेएन.१’ या नव्या उपप्रकाराचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण सिंधुदुर्गमध्ये आढळला आहे. केरळमध्ये सर्वप्रथम ७९ वर्षीय महिलेला याची लागण झाली. ही महिला आता पूर्णपणे बरी आहे.

त्यानंतर ‘जेएन. १’चा देशातील दुसरा रुग्ण महाराष्ट्रात आढळला असून तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४१ वर्षीय पुरुषाला या नव्या उपप्रकाराचा संसर्ग झाला आहे. नागरिकांनी आवश्यकतेनुसार गरजेच्या ठिकाणी मास्क घालणे, वारंवार हात धुणे व इतर योग्य वर्तन गरजेचे असल्याची सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

देशात कोरोनाच्या ‘जेएन.१’ या नवीन व्हेरियंटचे आतापर्यंत दोन रुग्ण आढळले असले तरीही ते पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन आरोग्य खात्यातर्फे बुधवारी करण्यात आले. त्यात महाराष्ट्रासह केरळमधील एका रुग्णाचा समावेश आहे.

‘जेएन.१’ या व्हेरियटंचा एक रुग्ण केरळमध्ये सापडला. ती ७९ वर्षांची महिला आहे. तर राज्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४१ वर्षीय पुरुषाला या व्हेरियंटचा संसर्ग झाल्याचे जनुकीय क्रमनिर्धारणात पुढे आले.

‘जेएन.१’ हा ओमिक्रॉन व्हेरियंटचा उपप्रकार आहे. रुग्णांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्वेक्षणांमध्ये आढळलेल्या संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

Maharashtra reports first case of Corona Variant  JN.1 in Sindhudurg latest Corona updates marathi news
PM face for INDIA bloc : 'हो! मीच मांडला खरगेंचा प्रस्ताव'; पंतप्रधानपदाचा उमेदवार का? ममतादिदी स्पष्टच बोलल्या

कोरोनापूर्व तयारी काय आहे?

  • राज्यातील आरोग्य संस्थांमधील कोरोनापूर्व तयारी पूर्ण. त्या अंतर्गत मॉकड्रील.

  • द्वितीय आणि तृतीय स्तरावरील आरोग्य संस्थांना सक्षम करण्यात आले आहेत.

  • नोडल अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधाची तयारी करण्यात येत आहे.

  • महापालिका आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा मॉकड्रीलमध्ये सहभाग.

  • रुग्णालयातील खाटा, अतिदक्षता विभाग, वैद्यकीय उपकरणे सुविधा सज्ज.

Maharashtra reports first case of Corona Variant  JN.1 in Sindhudurg latest Corona updates marathi news
Survey On NaMo App : भाजप खासदारांचं टेन्शन वाढलं! तिकीट देण्यापूर्वी ‘नमो’अ‍ॅप तपासणार लोकांचा मूड

हे करा

  • सहव्याधी असलेल्या रुग्णांनी गर्दीत जाणे टाळा

  • गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा

  • वारंवार स्वच्छ पाण्याने हात धुवा

  • चार हजार ७०० खाटांची व्यवस्था

राज्यात कोरोनाच्या ‘जेएन.१’ या नवीन व्हेरियंटचा एक रुग्ण आढळला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून शहरात कोरोना रुग्णांसाठी चार हजार ७०० खाटांची व्यवस्था केली आहे. त्यात विलगीकरणापासून ते व्हेंटिलेटरपर्यंतच्या खाटांचा समावेश आहे.

राज्यात ‘जेएन.१’ या नवीन व्हेरियंटचा रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाची बैठक घेण्यात आली. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. सूर्यकांत देवकाते म्हणाले, “शहरात नवीन व्हेरियंटचा अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांपर्यंत पोचून त्याची कोरोना चाचणी करणे आणि त्यांना उपचार देणे याला प्राधान्य दिले आहे.’’

Maharashtra reports first case of Corona Variant  JN.1 in Sindhudurg latest Corona updates marathi news
Jagdeep Dhankhar : मी सुद्धा २० वर्षांपासून असाच अपमान सहन करतोय... नकलेवरून मोदींनी केला उपराष्ट्रपतींना फोन

मॉक ड्रील झालेली रुग्णालये

सरकारी रुग्णालये ११

खासगी रुग्णालये ९३

खासगी वैद्यकीय महाविद्यालये २

खाटांची व्यवस्था

विलगीकरण कक्ष १,३०१

ऑक्सिजनची सुविधा २,२९६

अतिदक्षता विभागा ६७४

व्हेंटिलेटर ४२९

मनुष्यबळ

डॉक्टर २,४४२

‘कोरोना’ प्रशिक्षित डॉक्टर १,४८२

उपलब्ध परिचारिका ३,८४४

प्रशिक्षित परिचारिका २,२४९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.