मोखाडा : महाराष्ट्रात दररोज खुन, दरोडा तसेच बलात्कार करून हत्या केल्याच्या घटना घडत आहेत. पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुक्यात ही रविवारी 27 नोव्हेंबर ला एका 8 वर्षाच्या बालीकेची हत्या केल्याची घटना घडली आहे. सदरच्या बालिकेवर प्रथम बलात्कार करून तीची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे मोखाड्यासह संपुर्ण पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.