सरकारकडून आली गोड बातमी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना करता येणार लोकल प्रवास

सरकारकडून आली गोड बातमी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना करता येणार लोकल प्रवास
Updated on

मुंबई ता. 11 : राज्य शासनाकडून मुंबईतील लोकल प्रवासाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. सरकारने घेतलेला निर्णय मुंबई आणि मुंबई MMR भागातील शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.  

राज्यातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, निवारण व पुर्नवसन विभागाने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. रेल्वेने ही मागणी मान्य केल्यास लवकरच शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रेल्वेने प्रवास करता येणार आहे.

शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शिक्षणसंस्थांना शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना 50 टक्के उपस्थितीची सक्ती केली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकांनाही रेल्वे प्रशासनाची सुविधा देण्यात यावी अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत होती. उपनगरातील विविध भागातून मुंबईतील शाळांमध्ये येणाऱ्या शिक्षकांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी संघटनांकडून करण्यात येत होती.

त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन विभागाने रेल्वेकडे तशी मागणी केली आहे. 23 नोव्हेंबरपासून राज्यात नववी ते बारावीपर्यंतचे वर्गदेखील सुरू होणार आहे. त्यामुळे येत्या काळात शाळेत हजेरी लावणाऱ्या शिक्षकांची वाहतूक कोंडीच्या समस्येतून सुटका होणार आहे.

( संपादन - सुमित बागुल )

maharashtra state gives permission to teachers and school staff to travel by train

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.