नालासोपाऱ्यात एका कुटुंबाबरोबर नियतीचा क्रूर खेळ

लग्नाची तयारी सुरु होती आणि १० दिवसात होत्याचं नव्हतं झालं
hospital
hospitalesakal
Updated on
Summary

आणि १० दिवसात होत्याचं नव्हतं झालं.

नालासोपारा: काही आठवड्यांपूर्वी नालासोपारा (Nalasopara family)येथे राहणारे शेख कुटुंब आनंदात होते. घरात लग्नसोहळ्याची जोरात तयारी सुरु होती. पुढे काही वाईट घडेल, याची कोणी पुसटशीही कल्पना केली नव्हती. पण एप्रिलच्या अखेरीस चित्र बदललं. याला कारण ठरला कोरोना व्हायरस. कुटुंबातील तिन्ही बहिणींमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं दिसू लागली. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्रास उत्तरोत्तर वाढत गेला. अखेर दोन बहिणींचा पाठोपाठ १० दिवसाच्या अंतराने कोरोनामुळे मृत्यू (Covid deaths) झाला. एका बहिणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Maharashtra Two Covid deaths within ten days Nalasopara family counts its losses)

शेख कुटुंब नालासोपाऱ्यात राहते. तीन बहिणी, दोन भाऊ असा परिवार आहे. एक भाऊ अहमद शेख रिक्षाचालक आहे तर अलीची पानाची गादी आहे. या भावंडांमधील लहान बहिण शकीला शेखला (३५) श्वास घेताना त्रास होत होता. २५ एप्रिलला अखेर तिने विरारच्या महापालिका रुग्णालयाबाहेर प्राण सोडले. तिला रुग्णालयात बेड मिळू शकला नाही. त्यानंतर नऊ दिवसांनी मंगळवारी शेख कुटुंब पुन्हा रुग्णालयाच्या शवागराबाहेर होते. मोठी बहिण तालमुनीस्साचेही (५०) कोरोनाने निधन झाले. तिच्या एकुलत्या एक मुलीचे लग्न ठरले होते. ईद नंतर तिचे लग्न होणार होते. त्याच लग्नाची घरी लगबग सुरु होती.

शेख कुटुंबाच्या स्थितीवरुन मुंबई लगतच्या शहरांमध्ये आरोग्य व्यवस्थेची किती भयानक स्थिती आहे, त्याची कल्पना येते. लोकांना उपचारांसाठी मुंबईला यावे लागत आहे. तिथे त्यांना वेगळया प्रकारच्या संघर्षाचा सामना करावा लागतो. तालमुनीस्साला २५ एप्रिलला मीरा रोडच्या जय अंबे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच रात्री ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली. त्यामुळे रुग्णालयाने तालमुनीस्साला दुसऱ्या रुग्णालयात हलवायला सांगितले.

hospital
कोरोना व्हायरसप्रमाणे मराठा आरक्षण अल्ट्रा व्हायरस - गुणरत्ने सदावर्ते

सनराईज रुग्णालयात आयसीयू बेड मिळाला. पण रुग्णालयाने एक लाख रुपये भरण्यास सांगितले. शेख कुटुंबाने पैसे जमवायला सुरुवात केली. सर्व बचत मोडून ६० हजार रुपये जमवले. हॉस्पिटलला विनवण्या केल्यानंतर त्यांनी दाखल करुन घेतले. दुसऱ्या लॉकडाउनमुळे दोन्ही भावांची कमाई बंद झाली आहे. रिक्षाही चालवता येत नाहीय आणि पानाची टपरीही बंद आहे. इंडियन एक्स्प्रेसने वृत्त दिले आहे.

तालमुनीस्सा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सनराईज हॉस्पिटलने त्यांना रेमडेसिव्हीर आणि टॉसिलझुम्बा इंजेक्शनची व्यवस्था करण्यास सांगितले. त्यांनी औषधांचा शोध सुरु केला. काळ्या बाजारात टॉसिलझुम्बा इंजेक्शन ४५ हजार रुपयात उपलब्ध असल्याचे समजले. त्यांनी इंजेक्शनसाठी पैसे जमवायला सुरुवात केली. पण ते औषध मिळू शकले नाही. त्यानंतर हॉस्पिटलने त्यांना व्हेंटिलेटर उपलब्ध असलेल्या मुंबईतील रुग्णालयात हलवायला सांगितले.

hospital
आम्हा पती-पत्नीचा खून झाला तरी लढाई चालू राहिल- गुणरत्ने सदावर्ते

मीरा-भाईंदर पालिकेकडे फक्त ४० आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेत. अखेर ३० एप्रिलला बऱ्याच प्रयत्नानंतर नायर रुग्णालयात व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था झाली. पण रुग्णालयाने १.८६ लाखाचे बिल भरत नाही, तो पर्यंत डिस्चार्ज देण्यास नकार दिला. अखेर एका एनजीओच्या मदतीने १.४० लाखाचे बिल भरले. बऱ्याच प्रयत्नानंतर तालमुनीस्साला नायर रुग्णालयात हलवले. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही.

तालमुनीस्साचे निधन झाले होते. मृतदेह दफनविधीसाठी नेल्यानंतर तिथेही कागदपत्रांची समस्या उदभवली. काही स्टॅम्प नव्हते. त्यानंतर नायर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी लगेच स्टॅम्प मारण्यासाठी एका व्यक्तीला तिथे पाठवले. दफनविधीसाठी या कुटुंबाला ८ हजार रुपये भरावे लागले. तिसऱ्या बहिणीची प्रकृती सुद्धा गंभीर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.