Latest Mumbai News| राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. विविध पक्षांच्या, नेत्यांच्या दररोज प्रचारसभा, रॅली, मेळावे आयोजित केले जात आहेत. अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्षांकडून डिजिटल जाहिरातींवरही भर दिला जात आहे.
त्यानुसार मागील १० दिवसांत राज्यात डिजिटल जाहिरातींवर ६.८० कोटी खर्च करण्यात आल्याचे गुगल ॲड्स ट्रान्सपरेन्सी सेंटरच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.
विधानसभेचे मतदान अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपले आहे. विविध राजकीय पक्ष तसेच उमेदवारांकडून पारंपरिक प्रचारासोबतच डिजिटल जाहिरातींचाही वापर केला जात आहे.