राज्यातील मतदारांना EVM ऐवजी मतपत्रिकेचा पर्याय; विधानसभा अध्यक्षांच्या सूचना

राज्यातील मतदारांना EVM ऐवजी मतपत्रिकेचा पर्याय; विधानसभा अध्यक्षांच्या सूचना
Updated on

मुंबई - राज्यातील आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. राज्यातील मतदारांना आता मतपत्रिकेचाही पर्याय उपलब्ध होऊ शकतो. विधान सभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत कायदा करण्याच्या सूचना विधीमंडळाला दिल्या आहेत अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका राज्य निवडणूक आयोगाच्या अखरित्यात घेतल्या जातात. या निवडणूकांमध्ये मतदारांना मतदारांसाठी ईव्हिएम मशीन ऐवजी मतपत्रिकेचा पर्याय मतदानासाठी उपलब्ध करून देण्यासाठी कायदा करण्यात यावा अशी सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधीमंडळाला केले आहे. ईव्हिएमच्या बाबतीत अनेक शंका लोकांच्या मनात आहेत. आपण ज्यांना मतदान केले त्यांनाच मतदान होतं की नाही. याबाबत प्रश्नचिन्ह लोकांच्या मनात आहे. याबाबतीत नागपूरातील एका नागरिकाने पटोले यांच्याकडे निवेदन दिले होते. त्याबाबत आता पटोले यांनी या सूचना केल्या आहेत. पटोले यांच्या सूचनेबाबत राज्य सरकार काय पाऊल उचलते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

------------------------------------------------- 

maharashtra voters have the option of a ballot instead of an EVM Instructions of nana patole

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()