...पण 'चले जाव' घोषणा थांबली नाही; कळंबच्या स्वातंत्र्य सैनिकांचा लढा

तुरुंगात डांबले,उपाशी ठेवले मारहाण केली मात्र चले जाव घोषणा थांबली नाही
freedom fighter memories
freedom fighter memoriessakal media
Updated on

वसई : ऑगस्ट 1942 महात्मा गांधी (mahatma gandhi) यांनी चले जाव ची घोषणा करत इंग्रजांना (british) पळताभुई केले याचवेळी वसई तालुक्यातील (vasai) कळंब गावातील (kalamb village) 100 हुन अधिक नागरिकांनी देशप्रेमाने प्रेरित होत ऑगस्ट क्रांती मैदानात झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला होता. यातील13 स्वातंत्र्यसैनिकांना (freedom fighter) पकडून कारागृहात (jail) डांबले. मात्र, इंग्रजांच्या दबावाला, अत्याचाराला बळी पडले नाहीत तर ते त्यांच्या मतावर ठाम राहिले, मरण आले तरी चालेल मात्र, चले जावची घोषणा थांबली नाही, सुरूच ठेवली. देशाला स्वातंत्र मिळावे म्हणून गावातील स्वातंत्र्यसैनिकांचा मोलाचा वाटा आजही स्मरणात ठेवला जात आहे.

नालासोपारा कळंब गाव हे समुद्रकिनारी आहे स्वातंत्र्यसैनिकांचे गाव म्हणून ओळख आहे.गावातील 100 हुन अधिक जणांनी महात्मा गांधी यांच्या सोबत आंदोलनात सहभाग घेतला. देशाला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी सुरु झालेला लढा पाहता इंग्रजांनी धरपकड सुरु केली,कळंब गावातील 13 जणांना ठाणे मध्यवर्ती कारागृहात डांबण्यात आले अत्याचार केले,मारहाण केली,जेवण देखील मिळाले नाही मात्र अशातही देशासाठी लढायचं हा निर्धार कायम होता आणि तब्बल 6 महिन्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली असे स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग केशव निजाई यांचे पुत्र जगदीश निजाई यांनी सकाळशी बोलताना माहिती दिली.

freedom fighter memories
मुंबईत आयसीयू बेड न मिळाल्याने क्षयग्रस्त महिलेचा मृत्यू

त्यांनी पारतंत्र्यातून मुक्तता करण्या दिली संसाराची आहुती कळंबच्या स्वातंत्रसैनिकांनो तुम्हा लाख लाख सलाम ही कविता देखील लिहली आहे.आम्हाला अभिमान आहे आमच्या गावाने देखील देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यात माझे सासरे देखील हिरीरीने सहभागी झाले अशा कुटूंबात मी संसार करते, मी नशीबवान आहे असे सून भामिना या आनंदाने सांगतात.

स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग निजाई यांचा जन्म 8 जुलै 1924 साली झाला व 2 जानेवारी 2008 साली मृत्यू झाला यावेळी शोकसभेत कवी आनंद घरत यांनी हे मातृभूमी तव चरणी वाहिले जीवन सारे या कवितेतून श्रद्धांजली अर्पण केली या कवितेत देशभावना मांडण्यात आल्या.निजाई यांचा सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी अपार मेहनत घेतली. गावपाड्यातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले.पांडुरंग निजाई यांची मुलगी पुष्पा मेस्त्री निजाई या राष्ट्रीय कबड्डीपट्टू आहेत ज्यांनी देशासाठी लढा दिला.

कळंब गावात शासकीय जागेवर स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक उभारण्याची मागणी केली आहे.परंतु शासनाच्या लालफितीत अडकून पडल्याने हे स्मारक अद्याप होऊ शकले नाही याची खंत असल्याचे माजी उपसरपंच ऍड आनंद घरत यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्यसैनिकांची नावे, त्यांची छायाचित्र कळंब ग्रामपंचायतीत लावण्यात आली असून, देशहिताला प्रेरित करत आहेत हे विशेष म्हणावे लागेल.स्वातंत्र्याला जरी 75 वर्ष झाली तरी मात्र ज्या देशवासीयांनी स्वातंत्र मिळावे म्हणून प्राणाची आहुती दिली , तुरुंगात गेले अशा स्वातंत्रसैनिकांचे ऋण चुकवता येणार नाही अशी भावना येथील नागरिक व्यक्त करत आहेत.

freedom fighter memories
मुंबईत दिवसभरात 267 नव्या रुग्णांची भर, तर 4 रुग्णांचा मृत्यू

स्वतःला भाग्यवान समजते माझे पती पांडुरंग निजाई यांनी देशहिताचे काम केले तुरुंगात डांबले असतांना देखील घाबरून न जाता लढले असे सांगताना स्वातंत्र्यसैनिकाच्या पत्नी जमनाबाई पांडुरंग निजाई भावुक झाल्या.डोळ्यातून अश्रू वाहू लागले.आमच्या गावात स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक व्हावे ही इच्छा आहे.पदरमोड करून आर्थिक मदत मी देईन पण शासनाने स्मारक उभारावे अशी विनंती देखील जमनाबाई या शासनाकडे करत आहेत.त्यांची आर्त हाक शासनापर्यंत जाईल का ? याची प्रतीक्षा कळंबकर नागरिक करत आहेत.

कळंब गावातील 13 स्वातंत्र्यसैनिकांची नावे

पांडुरंग केशव निजाई,जग्गनाथ मालोजी निजाई,पांडुरंग बुधाजी निजाई,आत्माराम गोविंद म्हात्रे,जग्गनाथ वामन म्हात्रे,लक्ष्मण कालिदास गोवारी,रामचंद्र कालिदास गोवारी,रामचंद्र माणिक मेहेर,महादेव दामोदर घरत,वासुदेव काळू घरत,बळवंत कृष्णा घरत,रामचंद्र वामन किणी,रामचंद्र वामन तांडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.