Mumbai: महाराष्ट्रातील ओबीसी जातींनी एकत्रित येवून मतदान करावे, यासाठी भाजपने महायुतीमार्फत जोरदार प्रयत्न सुरू केले असून ‘एक हैं तो सेफ हैं’ हा हिंदू एकत्रीकरणाचा नारा मराठा, ओबीसींना हाक घालणारा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे मराठा समाजाला साद घालून अत्यंत खोलात जाऊन ओबीसी समाजाला एकत्र करण्याचे समीकरण महायुतीने तयार केले आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाने शोध घेतलेल्या आकडेवारीनुसार राज्यात ३८ टक्के लोकसंख्या ही ओबीसी समाजाची आहे. मराठा समाजाची लोकसंख्या सुमारे ३३ टक्के आहे. याच ओबीसी समाजाच्या आधारे जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे नियोजन केल्याची माहिती भाजपच्या एका नेत्याने दिली.