Mahayuti: मध्यरात्री शिंदे अन् अमित शाह यांच्यात नक्की काय चर्चा झाली? वाचा इनसाईड स्टोरी

Ekanth Shinde Meet Amit Shah Inside Story: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागावाटपाचे निर्णय लवकर घ्यावे अशी विनंती शहांकडे केली आहे.
Mahayuti: मध्यरात्री शिंदे अन् अमित शाह यांच्यात नक्की काय चर्चा झाली? वाचा इनसाईड स्टोरी
Updated on

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेसमोर ७० तर राष्ट्रवादी काँग्रेससमोर ४० जागांचा प्रस्ताव ठेवल्याचे समजते. राज्यातील विद्यमान स्थितीचा विचार करूनच हा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे समजते.

अर्थात हा प्रस्ताव आहे यावर तिन्ही पक्षांमध्ये आणखी चर्चा होईल. महायुतीच्या तब्बल दीड तास चाललेल्या बैठकीत जागा वाटप आणि प्रचाराच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

Mahayuti: मध्यरात्री शिंदे अन् अमित शाह यांच्यात नक्की काय चर्चा झाली? वाचा इनसाईड स्टोरी
Mahayuti: महायुतीत कोणाला किती जागा मिळणार; अमित शहांसोबतच्या बैठकीत आज होणार शिक्कामोर्तब?

भाजप १६० जागा लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार जे आमदार घेऊन आले त्या सर्वांना सामावून घेतले जाईल मात्र जिंकण्यासाठी लढायचे असल्याने अधिक जागांचा आग्रह धरू नका असे त्यांना सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागावाटपाचे निर्णय लवकर घ्यावे अशी विनंती शहांकडे केली आहे.

लोकसभेत जागावाटपाला विलंब झाला, उमेदवार उशिरा घोषित झाल्याने जागा पडल्या हे देखील शिंदे यांना सोदाहरण शहांना समजून सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र अधिकच्या जागांचा आग्रह धरल्याचे बोलले जाते.

शिवसेनेला दिल्या जातील तेवढ्याच जागा आम्हाला हव्यात अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. अजित पवार आणि सुनील तटकरे हे दोघेही आग्रही आहेत.

Mahayuti: मध्यरात्री शिंदे अन् अमित शाह यांच्यात नक्की काय चर्चा झाली? वाचा इनसाईड स्टोरी
Mahayuti Politics: राष्ट्रवादीला डिवचलं! अजित पवारांना काळे झेंडे दाखवणाऱ्या भाजप नेत्याला मोठा निधी मंजूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.