Prasad Lad-Ambadas Danve: 'आम्ही ज्यांना मातोश्री म्हणायचो, त्या...'; प्रसाद लाड यांनी दानवेंवरून उद्धव ठाकरेंना केलं लक्ष्य

Prasad Lad demand resignation to Ambadas Danve: दानवे यांनी माफी मागवी यासाठी लाड हे विधानभवनाच्या पायऱ्यावर बसले असून त्यांनी अंबादास दानवेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Prasad Lad
Prasad Lad
Updated on

मुंबई- भाजप आमदार प्रसाद लाड हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. सोमवारी विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे यांनी थेट सभागृहात लाड यांना शिवीगाळ केली होती. त्यावरून मोठा गदारोळ निर्माण झाला होता. दानवे यांनी माफी मागवी यासाठी लाड हे विधानभवनाच्या पायऱ्यावर बसले असून त्यांनी अंबादास दानवेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

प्रसाद लाड माध्यमांशी बोलताना म्हणाले की, माझ्या आईला-बहिणीला ज्या शिव्या दिल्या गेल्या ते महाराष्ट्राला कधीही आवडणाऱ्या नव्हत्या. असं विधिमंडळात कधीही झालं नव्हतं. माझ्या आईचे २५ वर्षांपूर्वी कॅन्सरने निधन झाले आहे. त्या आईबद्दल असे अपशब्द काढणे एका विरोधी पक्षनेत्याला किती योग्य वाटतं याचा त्यांनी विचार करावा.

Prasad Lad
Maharashtra Assembly Monsoon Session Updates: विधी मंडळाच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी काय काय घडले? वाचा एका क्लिकवर

ज्या मातोश्रींबद्दल आम्ही म्हणतो. कैलाशवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्या पत्नी होत्या. त्यांना तमाम महाराष्ट्र मातोश्री म्हणायचा. त्यांचा पुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा नेता जेव्हा अशा शिव्या देतो. त्यावेळी त्याला प्रश्न विचारला का? असा प्रश्न मला उद्धव ठाकरेंना विचारायचा आहे. माझ्या आई-बहिणीचा अपमान केला गेला, असं ते म्हणाले.

दानवे म्हणाले माझ्यावर दंगलीचे ७६ गुन्हे आहेत. मी मारून टाकेन, कापून टाकेन याच्यावर मला भाष्य करायचं नाही. पण, आम्ही सुद्धा परळ-लालबागसारख्या जिथे शिवसेनेचा उगम झाला, हिंदूत्वाचा उगम झाला अशा ठिकाणी आम्ही लहानाचे मोठे झालो आहोत. सुसंस्कृत असल्याने जशाच तसे मी उत्तर दिलं नाही, असं लाड म्हणाले.

Prasad Lad
Sakal Podcast : 'डरिये मत, डराओ मत' पहिल्याच भाषणात राहुल गांधी कडाडले ते पाणीपुरीमुळे कर्करोगाचा धोका?

रात्री मी झोपू शकलो नाही. माझ्या आईला शिव्या दिल्याने मला दु:ख झालं आहे. मुख्यमंत्री शिंदेंना तीनवेळा मी फोन केला आहे. ते सध्या नागपूरला आहेत. याची शिक्षा विरोधी पक्षनेत्याला व्हायला पाहिजे, त्यांचे निलंबन झाले पाहिजे. त्यांनी राजीनामा द्यावा आणि माझी नाही तर माझ्या आईची माफी मागावी, असं प्रसाद लाड म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.