कामगारांना पगारवाढ करारातून न्याय; महेंद्र घरत यांचे स्पष्टीकरण

mahendra Gharat
mahendra Gharatsakal media
Updated on

उरण : न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेने हजारो कामगारांना भरघोस पगारवाढीचे करार (Huge payment agreement) आणि उत्तम बोनस (bonus) मिळवून देऊन न्याय दिला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरणात आहे. कामगारांना आम्हीच न्याय (workers justice) देऊ शकतो, असा विश्वास महेंद्र घरत (mahendra gharat) यांनी शेलघर येथे पत्रकार परिषदेत (press conference) व्यक्त केला.

mahendra Gharat
Photo: रोमँटीक पोज देत रणबीर-आलियानं दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महेंद्र घरत दरवर्षी न्यू मेरिटाइम अँड जनरल कामगार संघटनेचा वर्षभरात केलेल्या कामाचा लेखाजोखा वाचण्यासाठी पत्रकार परिषद घेत असतात. याही वर्षी शेलघर येथे गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन संघटनेने केलेल्या कामाची माहिती पत्रकारांना दिली आहे. आम्ही कामगारांना दिलेल्या न्यायामुळे २०२१ मध्ये संघटनेवर विश्वास ठेवून १२ कंपनीचे युनिट आमच्याकडे आले आहेत.

यावर्षी आम्ही कामगार संघटनेमार्फत ११ युनिटचे पगारवाढीचे करार केले आहेत. पगारवाढीमुळे कामगारांमध्ये आणि कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज अनेक वर्षे कामगारांना न्याय दिल्यामुळे अनेक युनिट आमच्याकडे येत आहेत. त्यामुळे या कामगारांना नेहमी संघटनेतर्फे न्याय दिला जाईल, असा विश्वास त्यांनी या वेळी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.