माहीम रेतीबंदर परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करणार, ठाकरेंची ग्वाही

aditya-thackeray
aditya-thackeraysakal media
Updated on

मुंबई : माहिम समुद्र किनारी (mahim beach) सुभोभिकरणाचे (beautification) काम अंतिम टप्प्यात आले आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी माहिम किनाऱ्याला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. माहीम रेतीबंदर परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास केला (tourism center) जाईल, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. (mahim beach-beautification-Aditya Thackeray-tourism center-nss91)

माहीम रेतीबंदर परिसरात माहीमचा किल्ला आहे तसेच येथून वांद्रे वरळी सागरी सेतूचे विहंगम दृश्य नजरेस पडते. या परिसराचे सुशोभीकरण करून सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यास पर्यटनाच्या दृष्टीने नागरीकांसाठी चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकेल, असे आदित्या ठाकरे म्हणाले. यावेळी माजी महापौर, नगरसेवक मिलिंद वैद्य, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ संजीव कुमार, उपायुक्त हर्षद काळे, सहायक आयुक्त किरण दिघावकर आदी उपस्थित होते.

aditya-thackeray
राज्यातील महाविद्यालये सप्टेंबरमध्ये होणार सुरु?; उच्च शिक्षण मंत्र्यांचे संकेत

आदित्य ठाकरे यांनी या परिसराचे सुशोभीकरण करताना भिंतीवर माहिमचा किल्ला तसेच सागरी सेतू यांच्याशी मिळतीजुळती चित्रे रेखाटावीत, रेतीचा भाग स्वच्छ करून घ्यावा, विविध शिल्पकृती तयार करून त्यामध्ये सुसंगत अशी वृक्षलागवड करावी, माहीम चे नाव आणि सागरी सेतु यांच्याशी सुसंगत पर्यटकांना आकर्षित करणारी एलईडी लाईट ची कलाकृती तयार करावी, ओपन जिम उभारावी अशा विविध सूचना केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.