Haji Ali Dargah Bomb Threat: मुंबईतील 'हाजी अली दर्ग्या'ला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! अज्ञात फोनमुळं खळबळ

याप्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात फोन करणाऱ्या व्यक्तीविरोधात विविध कलमांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Haji Ali Dargah Bomb Threat: मुंबईतील 'हाजी अली दर्ग्या'ला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! अज्ञात फोनमुळं खळबळ
Updated on

मुंबई : वरळीतील हाजी अली दर्ग्याला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या दर्ग्याच्या ट्रस्टच्या माहिम येथील कार्यालयात धमकीचा फोन आल्यानं खळबळ उडाली आहे. बुधवारी हा धमकीचा फोन आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

Haji Ali Dargah Bomb Threat: मुंबईतील 'हाजी अली दर्ग्या'ला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! अज्ञात फोनमुळं खळबळ
MPSC Agri Exam: एमपीएससी परीक्षेत कृषी विभागाचा अखेर समावेश; 258 जागांसाठी होणार परीक्षा

याप्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात फोन करणाऱ्या व्यक्तीविरोधात विविध कलमांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हाजी अली दर्ग्याच्या कार्यालयात हा धमकीचा फोन आला होता. हाजी अली दर्ग्यात बॉम्ब ठेवल्याची माहिती देत तातडीने दर्गा खाली करण्याची धमकी त्यानं दिली होती. Haji Ali Dargah Latest News

Haji Ali Dargah Bomb Threat: मुंबईतील 'हाजी अली दर्ग्या'ला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! अज्ञात फोनमुळं खळबळ
Pune Metro: मोदींचा दौरा रद्द! पुण्यातील सिव्हील कोर्ट मेट्रो स्टेशन आज नेहमीप्रमाणं राहणार सुरु

फोनवरुन धमकी देणाऱ्यानं स्वत:चं नाव पवन असं सांगितलं असून त्यानं अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत दर्ग्याविषयी वादग्रस्त विधानंही केली असल्याचं ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं आहे. त्यानुसार, फोन करणाऱ्या व्यक्तीविरोधात कलम ३५१ (२), ३५२, ३५३(२), ३५३(३), भादंवि २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.