मुंबई, ता.25: दिल्ली,राजस्थान,गुजरात आणि गोव्यातून येणाऱ्या प्रवाशांना कोविड चाचणी बंधनकारकारक करण्यात आली आहे. त्यानंतर आता महापालिका प्रमुख रेल्वे स्थानके आणि शहराच्या प्रवेशव्दारांवर विविध पथके तैनात करणार आहे. कोविड चाचणीचा अहवाल दाखवल्या शिवाय प्रवाशांना मुंबईत प्रवेश दिला जाणार नाही.
देशातील काही राज्यात कोविडची दुसरी लाट सुरु झाली आहे. मुंबई महाराष्ट्रात कोविडचे रुग्ण वाढू लागले असले तरी संसर्गाची लाट अद्याप आलेली नाही. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सोमवारी दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोव्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नियमावली जाहीर केली आहे. यात कोविड चाचणी केल्याखेरीस प्रवाशांना मुंबईत प्रवेश करु दिला जाणार नाही. चाचणी न केलेल्या प्रवाशांसाठी चाचणीची सोय उपलब्ध करुन देण्याची सुचना महापालिकेने विमानतळ प्रशासनाला केली आहे. तर, मुंबईतील जंक्शन तसेच महत्वाच्या स्थानकांवरही पालिका पथक तैनात ठेवणार आहे. यात प्रवाशांकडे कोविड चाचणीचा अहवाल तपासला जाणार आहे. तो अहवाल नसल्यास रेल्वे स्थानकांवरच चाचणी करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या कोविड चाचणीचा अहवाला पॉझिटिव्ह असल्यास त्याला कोविड उपचार केंद्रात अथवा गरजेनुसार रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.
महत्त्वाची बातमी : मुंबई विमानतळावरून सहा कोटींचं कोकेन जप्त एका परदेशी महिलेला अटक
रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांवरही मुंबई महानगरपालिका लक्ष ठेवणार आहे. त्यासाठी मुंबईच्या पुर्व आणि पश्चिम उपनगरातील प्रवेशव्दारांवर पालिकेचे पथक तैनात करण्यात येणार आहे. हे पथक प्रवाशांचे 1-2 दिवस पुर्वीचे कोविडचे अहवाल तपासेल. तसेच, कोविड चाचणी न झालेल्या प्रवाशांची तात्काळ चाचणी करण्याची सोयही करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या वरीष्ट अधिकाऱ्याने दिली.
चाचण्याचे पैसे द्यावे लागणार ?
ट्रेनने मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची प्रवाशांनी कोविड चाचणी केली नसेल, तर त्यांची चाचणी रेल्वे स्थानकांवर करण्यात येणार आहे. मात्र, यासाठी प्रवाशांना पैसे मोजावे लागणार असल्याची शक्यता आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून चाचणी तसेच पडताळणी करण्यास बुधवार (ता.25) पासून सुरु करावे असे आदेश सहाय्यक आयुक्तांना अतिरीक्त आयुक्त सुरेश ककानी यांनी दिले आहे. तसेच रेल्वे स्थानकांवर रुग्णवाहीका आणि नजिक विलगीकरण केंद्राची सोय करुन ठेवावी असे निर्देश ही देण्यात आले आहे.
( संपादन - सुमित बागुल )
major action to avoid spread of covid19 various teams assigned to check people entering in mumbai borders
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.