Mumbai Traffic Advisory: मुंबईत मोठे वाहतूक बदल; जाणून घ्या कोणते मार्ग बंद अन् काय आहे पर्यायी व्यवस्था?

Mumbai Route Changes: यासाठी उपाय म्हणून मुंबई ट्राफिक पोलिसांनी काही मार्ग बंद करण्याचा आणि वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचा निर्णय घेतला आहे.
Mumbai Route Changes
Mumbai Route ChangesEsakal
Updated on

मुंबईतील वरळीमध्ये असणाऱ्या नेहरू तारांणात 30 आणि 31 जुलै रोजी विविध कार्यक्रम होणार आहेत. या क्रार्यक्रमांसाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता असून त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडू शकते. यासाठी उपाय म्हणून मुंबई ट्राफिक पोलिसांनी काही मार्ग बंद करण्याचा आणि वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मुंबई पोलिसांच्या ट्राफिक विभागाने एक्सवर पोस्ट करत बंद असलेल्या आणि पर्यायी मार्गांची माहिती दिली आहे.

पोलीस उपायुक्त समाधान पवार यांनी एक्सवर पोस्ट केलेल्या अधिसूचनेत सांगितले आहे की, "रजनी पटेल जंक्शन (लोटस जंक्शन) येथील हिंदुजा हाऊसमधून प्रवेश आणि सांघी पथ रस्त्यावरून बाहेर पडताना वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. ती कमी करण्यासाठी तात्पुरती वाहतूक व्यवस्थापन योजना लागू करण्यात आली आहे."

Mumbai Route Changes
Uran Murder Case:अखेर दाऊद शेखला अटक! यशश्री शिंदेच्या हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश

वळलेली वाहतूक आणि पर्यायी मार्गांचे तपशील

एकेरी वाहतूक: मोतीलाल सांघी रोडचे रूपांतर वन-वे रस्त्यावर केले जाणार आहे, फक्त सांघी पथ जंक्शन ते हिंदुजा हाऊसजवळील रजनी पटेल जंक्शन (लोटस जंक्शन) पर्यंत वाहतुकीस परवानगी असेल.

Mumbai Route Changes
Vishalgad violence: धुक्यामुळे कारवाई करण्यात अडचणी आल्या; विशाळगडावर हिंसाचार प्रकरणी राज्य सरकारचा न्यायालयात अजब दावा

पर्यायी मार्ग: रजनी पटेल जंक्शनवरून नेहरू सेंटर, NSCI किंवा मरियम्मा नगरकडे जाणारी वाहने थेट डॉ. ॲनी बेझंट रोडवरून खान अब्दुल गफ्फार खान जंक्शनपर्यंत जातील, त्यानंतर त्यांच्या गंतव्यस्थानी जाण्यासाठी यू-टर्न घ्यावा लागेल.

हे वाहतूक बदल 30 जुलै रोजी सकाळी 10 ते 31 जुलै रोजी रात्री 8 वाजेपर्यंत लागू होतील. वाहन चालकांनी त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे आणि गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे सांगण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()