Badlapur School Crime: बदलापूर प्रकरणात सर्वात मोठा ट्वीस्ट! आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांचा धक्कादायक दावा, केली मोठी मागणी

Akshay Shinde's Father Claims Innocence, Demands Justice : बदलापूर प्रकरणामुळे अक्षय शिंदेच्या कुटुंबाला गावातून हुसकावून लावण्यात आले आहे. खरवई गावातील लोकांनी मंगळवारी संध्याकाळी शिंदे यांच्या घरात तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या घरावर पोलिस संरक्षण ठेवण्यात आले आहे.
Protests erupt in Badlapur as locals demand justice for the victims, while Akshay Shinde's family claims innocence.
Protests erupt in Badlapur as locals demand justice for the victims, while Akshay Shinde's family claims innocence.esakal
Updated on

Badlapur Crime Case: बदलापूरमधील बाल शोषण प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. एका प्रसिद्ध शाळेत ४ वर्षांच्या दोन चिमुरड्यांवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात सफाई कामगार अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली आहे. परंतु, आता या प्रकरणात एक मोठा ट्वीस्ट आला आहे. अक्षय शिंदेच्या वडिलांनी दावा केला आहे की, त्यांचा मुलगा या प्रकरणात निर्दोष आहे आणि त्याला फसवण्यात आले आहे.

अक्षय शिंदे निर्दोष असल्याचा दावा-

अक्षय शिंदेच्या वडिलांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले की, "अक्षयने जे काही केले, त्यात काहीही चुकीचे नाही. तो फक्त बाथरूम सफाईचे काम करतो, त्यामुळे मुलींवर अत्याचार करण्याचा प्रश्नच येत नाही." त्यांनी हा दावा केला की, अक्षयला या प्रकरणात फसवण्यात आले आहे.

अक्षयच्या कुटुंबाची मागणी-

अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे की, त्यांना मारहाण करण्यात आली आहे. याचबरोबर त्यांनी अक्षयची पुन्हा मेडिकल चाचणी करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, या चाचणीद्वारे अक्षयच्या निर्दोषतेचा पुरावा मिळू शकतो.

अक्षयची आई म्हणाली, अक्षयला १५ दिवस झाले कामाला लावून, १३ तारखेला घटना घडली. अन् अक्षयला १७ तारखेला धरुन घेऊन गेले. आम्हाला तिथल्या काम करणाऱ्या बाईने सांगितलं की अक्षयला पोलीस घेऊन गेले. तेवढच मला माहिती झालं. पोलीस लोक मुलाल मारू लागले, माझ्या लहान मुलाल पण मारलं. चौकीत पोलिसांनी सांगितले. अक्षयला फक्त बाथरुम धुवायचं काम होतं. तो रोज ११ वाजता बाथरुम धुवायचा. पुरुषांचे बाथरुम देखील तो धूत होता. आम्ही सगळं कुटुंब तिथं काम करतो. 

गावकऱ्यांनी कुटुंबाला हुसकावून लावले-

बदलापूर प्रकरणामुळे अक्षय शिंदेच्या कुटुंबाला गावातून हुसकावून लावण्यात आले आहे. खरवई गावातील लोकांनी मंगळवारी संध्याकाळी शिंदे यांच्या घरात तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या घरावर पोलिस संरक्षण ठेवण्यात आले आहे.

Protests erupt in Badlapur as locals demand justice for the victims, while Akshay Shinde's family claims innocence.
Mumbai Crime: सोशल मीडियावर मैत्री; अंधेरी अन् गुजरातमध्ये १३ वर्षीय मुलीवर अत्याचार, तीन दिवस पीडिता गायब, घरी परतातच...

गावकऱ्यांचा फतवा-

बदलापूरमधील लोकांनी अक्षय शिंदेच्या कुटुंबाला गाव सोडण्याचा फतवा जारी केला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला गावाबाहेर काढण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या घरात तोडफोडही करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेमुळे शिंदे कुटुंबाला अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

अक्षय शिंदेची पार्श्वभूमी-

अक्षय शिंदे हा खरवई गावाचा रहिवासी असून त्याचे वय २४ वर्षे आहे. त्याने तीन लग्न केली आहेत, परंतु त्याच्या तिन्ही पत्न्या त्याच्याबरोबर राहत नाहीत. अक्षयने फक्त १० वी पर्यंत शिक्षण घेतले असून तो बदलापूरमधील एका शाळेत सफाई कामगार म्हणून काम करत होता. यापूर्वी तो सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता. अक्षयचा जन्म बदलापूरमधील खरवई गावात झाला असून तो आपल्या आई-वडिलांसोबत एका चाळीत राहतो.

Protests erupt in Badlapur as locals demand justice for the victims, while Akshay Shinde's family claims innocence.
Pornography Fueling Sexual Crimes: कोलकाता ते बदलापूर बलात्काराच्या घटनांमध्ये PORN VIDEO ची भूमिका; भारतातील कायदे किती आहेत कडक?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.