Makar Sankrant: पक्ष्यांवर संक्रांत! रंगीबेरंगी पतंगांचा मांजा उठला पक्ष्यांच्या जिवावर

धारदार मांजा हा पक्षांसाठी कायमच नुकसानकारक ठरला आहे.
Makar Sankranti
Makar Sankrantisakal
Updated on

मुंबई : रंगीबेरंगी पतंग उडवत मकर संक्रांत सण साजरा केला जातो.मात्र यासाठी बंदी असलेला धारदार मांजा वापरला जात असल्याने हा मांजा अनेक पक्ष्यांच्या जिवावर बेतला तर अनेक पक्षी जखमी झाले. आज एका दिवसात सुमारे ४० पक्ष्यांना फटका बसला असून गेल्या ४ दिवसात मांजामुळे १०० पेक्षा अधिक पक्षी जखमी झाल्याची माहिती प्राणी मित्र संघटनांनी दिली आहे. (Makar Sankranti wounded birds during manja of kites flew)

Makar Sankranti
Water Supply: कुलाबा, डोंगरी भायखळ्यात दिवसभर पाणी पुरवठा बंद राहणार! पाणी जपून वापरण्याचं आवाहन

संक्रांत आली की तरुणांना पतंगांचे वेध लागतात. तरुणांमध्ये पतंगबाजीची मोठी क्रेझ आहे.पतंगबाजीसाठी नायलॉन तसेच धार असणाऱ्या मांजावर बंदी आहे. असे असले तरी एकमेकांच्या पतंगाची कंन्नी कापण्यासाठी धारदार मांजा खुलेआम वापरला जातो.यामुळे या मांजात अडकून अनेक पक्षी जखमी होतात. (Latest Marathi News)

Makar Sankranti
Atal Setu: 'अटल सेतू' उद्घाटन कार्यक्रमात 1,300 हून अधिक लोक पडले होते आजारी; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

यंदा पतंगबाजीचे प्रमाण तुलनेने कमी झालेले असली तरी १०० पेक्षा अधिक पक्षी जखमी अवस्थेत सापडले आहेत. यातील अनेक पक्षांवर विविध रुग्णालयात उपचार केले गेले. बाबत अधिक माहिती देतांना रेस्क्यु असोसिएशन फॉर वाइल्ड लाईफ वेलफेअर  (रॉ) संघटनेचे अध्यक्ष पवन शर्मा यांनी सांगितले की, मांजामुळे सुमारे ४० विविध पक्षी जखमी झाले.जखमी झालेल्या ४० पक्ष्यांपैकी १२ पक्षांचा मुत्यु झाला.यात घार,कबूतर कोकीळ आदी पक्षांचा समावेश आहे.यातील अनेक पक्ष्यांचे धड हे मांजामुळे छिन्न विछिंन्न झाल्याचे ही त्यांनी सांगितले. (Marathi Tajya Batmya)

Makar Sankranti
Eknath Shinde: ठाकरेंना शिंदेंचं कायदेशीर प्रत्युत्तर! हायकोर्टात दाखल केली याचिका; काय म्हटलंय? वाचा

आज ही सुमारे ३८ हून अधिक पक्षी गंभीर जखमी आहेत.त्यांच्यावर रॉ च्या डॉक्टर रिना देव या उपचार करत आहेत. किरकोळ जखमी झालेल्या पक्षांवर प्राथमिक उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले. जखमी पक्षांमध्ये कबुतर,कोकीळ,घार,कावळा,चिमणी,पाणकोंबडी आदी पक्षांचा समावेश आहे.मांजाचा काही खारूताई आणि सापांना ही फटका बसला.धाग्यामध्ये अडकून हे जखमी झाले आहेत. (Latest Maharashtra News)

काही प्राणीमित्र संघटनांनी जखमी पक्षांना खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.तर अनेक पक्षीप्रेमींनी अडकलेल्या आणि जखमी झालेल्या पक्षांबाबत माहिती दिली.तर अनेकांनी स्वताहून जखमी पक्षांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.

Makar Sankranti
India Poverty: भारतीतील दारिद्र्य घटलं! गेल्या नऊ वर्षात सुमारे २५ कोटी भारतीयांचा राहणीमानाचा दर्जा सुधारला

मकरसंक्रातीपूर्वीच पतंगबाजी करणार्‍या लोकांना प्राणी मित्र संस्था, संघटना आणि प्राणीप्रेमिंकडून पतंगबाजी करताना पक्षांचे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. गेल्या दोन वर्षात मांज्यामध्ये अडकून पंखाला जखमी होणे, मान कापली जाणे, पायाला इजा होण्यासोबत मांज्यात अडकून मृत होण्याचे प्रमाण वाढल्याचे ही प्राणी मित्र संघटनांचे म्हणणे आहे.

सण-उत्सव साजरा करताना पशु-पक्षांच्या सुरक्षेची देखील काळजी घ्यायला हवी.पतंग उडवण्यासाठी प्लास्टिकच्या मांजाचा वापर टाळायला हवा.पतंग उडवायचेच असतील तर खुल्या मैदानात उडवा.पक्षांच्या सुरक्षेबाबत नागरिक दुर्लक्ष करत असल्याने अशा घटना घडत आहेत, असं रॉ संघटनेचे अध्यक्ष पनव शर्मा यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.