मुंबईतील मलेरियाची रुग्णसंख्या कोरोना संख्येएवढी झाली आहे का ?

मुंबईतील मलेरियाची रुग्णसंख्या कोरोना संख्येएवढी झाली आहे का ?
Updated on

मुंबई : मुंबईतील कोरोनाचे रुग्ण सापडत असून मलेरियाची रुग्ण संख्याही त्याच तोडीने नोंद होत आहे. सोमवारी कोरोना रूग्णसंख्या 804 नोंदवण्यात आली. तर पावसाळी कालावधीत मुंबईतील मलेरिया रुग्णांची संख्या मलेरियाचे रुग्ण 821 एवढी नोंदवण्यात आली आहे. यामुळे मुंबईतील मलेरियाची रुग्ण संख्या कोरोना संख्येएवढी झाली का असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. दरम्यान पालिकेकडून मलेरियाची 821 ही रुग्ण संख्या या पावसाळी मोसमातील एकंदरीत असल्याचे सांगण्यात आले. शिवाय मुंबईतील मलेरिया नियंत्रणात असल्याचा निर्वाळा देखील देण्यात आला.

मलेरिया नियंत्रणात - 

यावर बोलताना मुंबई महापालिकेचे आरोग्य अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, "कोरोना रुग्णसंख्येत आणि मलेरिया च्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. गॅस्ट्रो आणि लेप्टोचेही रुग्ण कमी आहेत. त्यामुळे, इतर पावसाळी आजारांमध्ये घट झाली आहे."

गणेशोत्सवानंतर मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. त्यासाठी सरकारी पातळीवर 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र आता मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसून येत आहे. त्याच वेळी मलेरियाच्या प्रतिबंधात्मक योजना देखील सुरु असून मलेरियाही आटोक्यात आला असल्याचे सांगण्यात आले. 25 ऑक्टोबर पर्यंत नोंदवण्यात आलेल्या साथरोगाच्या आकडेवारीनुसार, मलेरिया रुग्ण 347 असल्याचे नोंदवण्यात आले. तर, लेप्टो 58, डेंगी 12, गॅस्ट्रो 76, कावीळचे 6 रुग्ण नोंदवण्यात आले असल्याचे पालिका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

malaria count of mumbai increasing raises concern BMC says malaria is in control 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.