मुंबई: राज्यात सध्या कडक लॉकडाउन (Maharashtra Lockdown) लावण्यात आला आहे. या लॉकडाउनचा परिणाम हळूहळू दिसू लागला आहे. घराबाहेर फिरताना मास्क (Mask is Must) लावणं आवश्यक असून नियमांचे (Guidelines) पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. साकीनाका (Sakinaka) परिसरातही मास्क न घालता फिरणाऱ्या व्यक्तीला हटकण्यात आलं. त्याची ओळख तपासल्यानंतर पोलिसांनाही (Police) धक्काच बसला. हा विनामास्क फिरणारा तरूण चक्क Most Wanted आरोपी निघाला. गेल्या वर्षी पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस त्याचा शोध घेत होते. अखेर मास्क न घातल्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागला आणि त्याला अटक करण्यात आली. (Man arrested for not wearing mask turned out to be most wanted criminal)
अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव मोहम्मद मोईउद्दीन सिद्धीकी. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. तक्रारदार हा पोलीस शिपाई असून तो सध्या साकीनाका पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. जानेवारी 2020 मध्ये साकीनाका परिसरात दोन भावांमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. यावेळी दारुच्या नशेत एका भावाने दुसऱ्या भावाला मारहाण केली. हा वाद खूप वाढल्यानंतर या प्रकरणी नियंत्रण कक्षाला तक्रार करण्यात आली. त्यानुसार पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही भावांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या दोन्ही भावांनी त्यांना शिवीगाळ व मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेले होते. मोहम्मद नुकताच विनामास्क फिरताना त्याला साकीनाका परिसरात एका पोलीस अंमलदाराने पाहिले. सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे मास्क न लावता नियमभंग केल्याप्रकरणी पोलिसाने त्याला विनामास्क फिरण्याचे कारण विचारले. त्यावेळी तपासणीत मोहम्मद हा पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी Wanted असलेला आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला पोलिस ठाण्यात आणल्यानंतर पडताळणी करून पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलिस मोहम्मदच्या भावाचाही शोध घेत आहेत.
(संपादन- विराज भागवत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.