Mumbai Crime : खासदार अरविंद सावंतांचे घेऊन मागवलं दोन लाखांचे जेवण! शेवटी 'असं' फुटलं बिंग

Man arrested for pretending to be MP Arvind Sawant's PA : खासदार अरविंद सावंत यांचा पीए असल्याची बतावणी करून एकाने कुलाब्यातील बडे मिया हॉटेल मालकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
अमली पदार्थाच्या विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक , सहा लाख ५० हजारांचा ऐवज जप्त
Mumbai Crimesakal
Updated on

बऱ्याचदा एखाद्या बड्या व्यक्तीचे नाव सांगून मोठी-मोठी कामे करून घेतली गेल्याचं आपण बऱ्याचदा पाहातो. लोक सर्रास छोट्या-मोठ्या सरकारी कामांसाठी नेत्यांच्या नावे सांगता किंवा त्यांचं पत्र पुढे करतात. मात्र एकाने खासदाराचे नाव सांगून चक्क वर्षभर एका हॉटेल मालकाला गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मुंबईत घडली असून संबंधीत खासदाराच्या कार्यालयातूनच या आरोपीबद्दल पोलिसांना माहिती कळवण्यात आल्याने आरोपीचे पितळ उघडे पडले.

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार अरविंद सावंत यांचा पीए असल्याची बतावणी करून एकाने कुलाब्यातील बडे मिया हॉटेल मालकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान या गंभीर प्रकरानंतर एकाल अटक करण्यात आली आहे.

आरोपीने युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे तसेच आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या नावाचा देखील गैरवापर केला असल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर हा आरोपी वर्षभरापासून खासदारांच्या नावे हॉटेल मालकाची फसवणूक करत होता.

अमली पदार्थाच्या विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक , सहा लाख ५० हजारांचा ऐवज जप्त
Vinesh Phogat :...बायकांनी यातून धडा घेतला पाहिजे; विनेशच्या वाढलेल्या १०० ग्रॅम वजनावर हेमा मालिनी काय बोलून गेल्या Video

त्याने वर्षभरात तब्बल ९ लाख २७ हजारांची फसवणूक केली. हॉटेल मालकाच्या मुलीला चर्चगेट येथील शासकीय लॉ कॉलेजमध्ये अॅडमिशन देण्याच्या नावाखाली हॉटेल मालकाला सात लाखांचा गंडा घातला. तर खासदारांच्या नावाचा गैरवापर करून आजवर तब्बल २ लाख रुपयांचे फुकट जेवण मागवलं.

अखेर याबद्दल अरविंद सावंत यांच्या कार्यालयातूनच पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर तोतयागिरीचा प्रकार समोर येताच काळाचौकी पोलिसांनी आरोपी सुरज कलव, ३० याला अटक केले. दरम्यान आरोपीवर याआधी देखील फसवणुकीचे गुन्हे दाखल आल्याची माहिती समोर आली आहे.

अमली पदार्थाच्या विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक , सहा लाख ५० हजारांचा ऐवज जप्त
Puja Khedkar : पूजा खेडकरच्या कारनाम्याचा सर्व अपंग उमेदवारांना बसणार फटका! सरकार जारी करणार पांढरे, पिवळे अन् निळे कार्ड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.