विकृतीचा कळस! भटक्या कुत्रीवर नराधमाकडून अनैसर्गिक अत्याचार

विकृतीचा कळस! भटक्या कुत्रीवर नराधमाकडून अनैसर्गिक अत्याचार
Updated on

मुंबईः ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी ४० वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. सध्या या विकृताची चौकशी पोलिस करत आहेत. त्यानं एका कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याच्यावर आयपीसी कलम ३७७ (अप्राकृतिक गुन्हे) आणि क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीनं दोन प्राणी मित्रांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील पादचारी पुलावर ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा वागळे इस्टेटमधील रोड क्रमांक १६ हजुरी येथे राहतो. 

शनिवारी सागर गुप्ता आणि त्याचे मित्र रस्त्यावर भटकणाऱ्या प्राण्यांना रोज खायला देतात. ठाणे येथील वागळे इस्टेटमधील जुन्या पासपोर्ट कार्यालयाजवळ स्कायवॉकवर आरोपी विजय महादेव चाळके हा कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार करत असल्याचं त्यांनी पाहिलं. त्यांनी आरोपीला पकडून ठेवलं आणि 100 नंबरवर फोन केला. तात्काळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं. आयुक्तांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याचे आदेश संबंधित स्थानिक पोलिसांना दिले असल्याची प्राणीमित्रांनी दिली.

आम्हाला वाटलं की तो बेघर आहे म्हणून स्कायवॉकवर राहत असेल, असं गुप्ता म्हणाले.  पोलिसांनी सांगितलं की, आरोपी केंद्र सरकारच्या एजन्सीमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करायचा  मात्र आता तो सध्या बेरोजगार आहे.

Man arrested by thane police for doing obscene behaviour with dog at Wagale Estate

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.