Mumbai Crime : इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्टवर कमेंट करणाऱ्याला जमावाने जमिनीवर घासायला लावले नाक

man beaten by  mob forced to rub his nose on ground over comments on an offensive post Video goes viral
man beaten by mob forced to rub his nose on ground over comments on an offensive post Video goes viral
Updated on

डोंबिवली : देवी देवतांविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा मुद्दा गाजत असतानाच एका अल्पवयीन मुलाने अशाच एका पोस्टला कमेंट्स केली. या कारणामुळे जमावाने 17 वर्षीय मुलाला बेदम मारहाण करून जमिनीवर नाक घासायला लावले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

सोशल मीडियावर देवी देवतांविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याने गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. या तणावाचे रूपांतर वादात झाले आहे. कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 17 वर्षीय मुलाने जो डिलिवरी बॉय म्हणून काम करतो. त्याने एका समाजाच्या देवस्थानाविषयी अज्ञाताकडून करण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टवर आक्षेपार्ह कमेंट केली होती.

दरम्यान दुसऱ्या एका गटाने या तरुणाला शोधून काढत बेदम मारहाण केली. नंतर त्याला अर्धनग्न करुन जमीनीवर नाक घासण्यास भाग पाडले. हा व्हिडियो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

man beaten by  mob forced to rub his nose on ground over comments on an offensive post Video goes viral
Beed Crime News : संतापजनक प्रकाराने बीड हादरलं! विधवा महिलेवर ७ जणांकडून सामूहिक बलात्कार

या पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली आहे. खडकपाडा पोलिसांनी अल्पवयीन तरुणाच्या तक्रारीनुसार त्याला मारहाण करणारे आणि जमीनीवर नाक घासण्यास भाग पाडणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. इतकेच नव्हे तर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या दुसऱ्या गटाच्या विरोधातही उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात याआधीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

man beaten by  mob forced to rub his nose on ground over comments on an offensive post Video goes viral
Karnataka CM : शपथविधीच्या दोनच तासात होणार निवडणुकीतील आश्वासन पूर्ण! राहुल गांधीची धडाकेबाज घोषणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.