अरे वाह! उपचार चांगले झाले म्हणून 'त्यांनी' केलं 'हे' कौतुकास्पद काम; वाचा संपूर्ण बातमी.. 

man reading paper
man reading paper
Updated on

मुंबई: महानगरपालिकेच्या रुग्णालयात रुग्णांचे हाल होतात, रुग्णांवर चांगले उपचार केले जात नाही हा सर्व समज मुंबईतील नायर रुग्णालयाने खोडून काढला आहे. काही दिवसांपूर्वी 65 वर्षीय जेष्ठ नागरिक ज्यांना न्यूमोनिया आणि मधुमेहाचा त्रास होता ते कोविड पाॅझिटीव्ह आले होते. उपचारासाठी त्यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले जिथे त्यांच्यावर यशस्वीरित्या उपचार केले गेले. नायर रुग्णालयात केलेले उपचार आणि सेवेने खुश होऊन या गृहस्थाने 50 हजार रुपयांची देणगी दिली. 

65 वर्षीय आजोबा दिलीप कदम यांचं मुंबईमध्ये साडीचे दुकान असून पत्नी, 2 मूलं, सून, नातू असा परिवार आहे. आजोबांना आधीपासूनच मधुमेहाचा त्रास आहे आणि त्यातच त्यांना न्यूमोनियाही झाला. उपचारासाठी दिलीप कदम यांना सर्वप्रथम खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, दिलीप कदम यांना तपासणी करण्यापूर्वीच खासगी रुग्णालयाने दीड लाख रुपये डिपॉझिट, सहा हजार रुपये एका दिवसाच्या बेडचं भाडं आणि उपचार होईल त्याचा खर्च वेगळा असा रेट कार्ड त्यांच्या मुलाला आधीच दिला. 

 महानगरपालिकेच्या रुग्णालयात नीट लक्ष दिले जात नाही हा गैरसमज दिलीप कदम यांच्या कुटुंबियांच्या मनात होता त्यामुळेच, त्यांनी खासगी रुग्णालयाची वाट सर्वप्रथम धरली. 

सुरूवातीचे पैसे भरू मात्र नंतर जर बिल वाढले तर काय करायचं ? हा प्रश्न कुटुंबातील लोकांपुढे उभा राहिला. त्यानंतर, त्यांनी नायर मध्ये उपचारांसाठी जाण्याचा निर्णय घेतला. 3 जूनला दिलीप कदम यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दिलीप कदम हे जेष्ठ नागरिक असल्यामुळे नायरमध्ये केस पेपरचे 10 रुपये सुद्धा घेतले गेले नाही. दिलीप कदम यांची कोरोना चाचणी करण्यात आली जी पाॅझिटीव्ह आली.

कुटुंबातील लोकांना महानगरपालिकेच्या ताडदेव येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यांत आलं. कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे फक्त फोन मुळेच दिलीप कदम आणि त्यांच्या कुटुंबियांचा संपर्क होत होता. मात्र, दिलीप कदम यांना कुटुंबाची कमतरता नायर रुग्णालयाच्या डॉक्टर आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांनी कधीच भासू दिली नाही. 15 दिवसाच्या यशस्वी उपचारां नंतर दिलीप कदम यांनी कोरोनावर मात केली आणि ते घरी परतले. 

खासगी रुग्णालयात लाखो रुपयांचं बिल आकरण्यात आलं असतं. मात्र, नायरमध्ये 15 दिवस उपचार घेऊन 1 रुपयाही बिल घेतलं नाही. नायर रुग्णालय गोर गरिबांना अशीच मदत करत राहो म्हणून सामाजिक बांधिलकी जपत 50 हजार रुपयांची देणगी दिलीप कदम यांच्या कुटुंबियांनी नायर रुग्णालयाला दिली. ज्या क्वारंटाईन सेंटरमध्ये कदम कुटुंबियाना ठेवण्यात आलं होतं तिथे सुद्धा उत्तम व्यवस्था करण्यात आल्याचे नितीन कदम यांनी सांगितले. तसेच, महानगरपालिकेच्या रुग्णालयात योग्य आणि काळजीपूर्वक उपचार होतात आणि यापुढे आम्ही महानगरपालिकेच्या रुग्णालयातच काही आजार असल्यास उपचार घेणार असल्याचे नितीन कदम यांनी सांगितले. 

या सर्वावर नायरचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी समाधान व्यक्त करत रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा असण्याची भावना व्यक्त केली. तसेच, डॉक्टर आणि आरोग्य सेवक फार उत्तम रित्या काम करत असतात. आमच्या येथे आलेले 90 ते 95 टक्के रुग्ण बरे होऊन घरी जातात असंही नमूद केले.

man donates 50 thousand rupees to nayar hospital 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.