Mumbai: २५ महिलांनची फसवून करून त्यांच्याची लग्न करणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. फिरोज नियाज शेख (वय ४३) असं आरोपीचं नाव आहे. नालासोपारा पोलिसांची याप्रकरणी कारवाई केली आहे. महिलांना जाळ्यात ओढून लग्न करणे आणि त्यांच्याकडून पैसे उकळणे हाच त्याचा धंदा होता.
आरोपीने तब्बल २५ वेळा लग्न केले आणि या सर्व पत्नींना अक्षरशः लाखो रुपयांना गंडवले. यातील एक लग्नाची बेडी मात्र गजाआड होण्यास कारणीभूत ठरली. पालघरच्या नालासोपारातील हा प्रकार आहे. आरोपीने आतापर्यंत अनेक महिलांचे स्वप्न उद्धवस्त केले आहेत, शिवाय त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले देखील आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फिरोज नियाज शेख याने २०१५ मध्ये पुण्यातील ४ महिलांना हेरून असेच लग्न केले. त्यानंतर तो २०२३ मध्ये ६ वेळा तुरुंगात जाऊन आला. मात्र त्यानंतरही त्याने फसवणूक सुरू ठेवत तब्बल २५ महिलांशी लग्न केले आणि महिलांची फसवणूक केली. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी त्याला चांगलाच धडा शिकवला.
फिरोज नियाज शेखने एका लग्न जमवणाऱ्या संकेतस्थळावरून एका महिलेशी ओळख वाढवली. तिच्याशी लग्न केले. त्यानंतर तिच्याकडून लॅपटॉप व कार घेण्यासाठी ६ लाख ५० हजार ७९० रुपये घेतले. त्यानंतर तो पसार झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या महिलेने नालासोपारा पोलिस ठाणे गाठले.
पोलिसांनी फिरोजचा शोध सुरू केला. मात्र त्याचा नंबर नसल्याने पोलिसांना तो सापडत नव्हता ...पोलिसांनी एक फेक महिलेची प्रोफाईल बनवून महिलेला भेटायला भेटायला बोलावले. तो कल्याणमध्ये असल्याची माहिती मिळताच नालासोपारा पोलिसांनी सापळा रचून त्याला जेरबंद केलं आहे. त्याने आतापर्यंत २५ जणांसोबत लग्न केल्याची कबुली दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.