'या' पोराने 'गुगल'ला येडा बनवून खाऊ घातला पेढा..

'या' पोराने 'गुगल'ला येडा बनवून खाऊ घातला पेढा..
Updated on

मुंबई - कोण कुठे कधी काय करेल याचा काहीही नेम नाही. ही बातमी वाचाल तर नक्की चकित व्हाल. कारण एका मुलाने चक्क 'गुगल'ला गंडवलंय. होय, या मुलाने चक्क 'गुगल'सोबत प्रॅन्क केलीये. सध्या आपल्याला कुठेही जायचं असेल तर सर्वात आधी आपण आपण गुगल मॅप सुरु करतो. कुठून जायचंय तो रास्ता पाहतो आणि फास्टेस्ट म्हणजेच सर्वात जलद रूट निवडून निघतो प्रवासाला. बरोबर ना ? तर या मुलाने थेट 'गुगल मॅप'लाच गंडवलं आहे. कसं ? पुढे वाचा.. 

काय आहे किस्सा

त्याच झालं असं की या मुलाने रस्त्यावरून जाताना तब्बल ९९ सेकेंडहॅन्ड मोबाईल्सचा वापर केला. हे मोबाईल या मुलाने सुरु केले. प्रत्येक मोबाईलमध्ये Google Maps चं ऍप्लिकेशन सुरु केलं. हे सर्व स्मार्टफोन एका ट्रॉलीत ठेवले आणि निघाला फेरफटका मारायला. आता तुमचे स्मार्ट फोन सुरु असतील आणि त्यात गुगल मॅप्स सुरु असतील तर त्याची माहिती 'गुगल'कडे जाते आणि गुगल ही माहिती गोळा करून कुठे, किती ट्राफिक याबद्दल ऍप वापरणाऱ्यांना अपडेट करतो. 

परिणाम काय झाला ? 

हा मुलगा रस्त्यावरून फिरत असताना गुगल मात्र चांगलंच बुचकळ्यात पडला. लगेच गुगलने  मॅप्स वापरणाऱ्या लोकांना याबद्दल अपडेट केलं आणि रस्त्यावर हेव्ही ट्राफिक आहे असं सूचित केलं. लगेच रस्ते लाल रंगात दिसायला लागलेत. कदाचित अनेकांनी हा मॅप पाहून स्वतःचा रस्ता मात्र नक्कीच बदलला असेल यात शंका नाही. 

मॅप्स वापरण्यासाठी बाजारात अनेक उपकरणे आहेत. अशात 'गुगल मॅप' फ्री असल्याने जगभरात सर्वत्रच याचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. भारतात मुख्यत्वे 'गुगल मॅप्स' वापरले जातात. अशात जिथे सर्वात जास्त किंवा हेव्ही ट्राफिक असले तर आपल्याला रस्ता लाल रंगात दिसतो, स्लो मूव्हिंग किंवा जरा कमी ट्राफिक असेल तर रस्ता पिवळा दिसतो तर अजिबात ट्राफिक नसेल तर रस्ता निळा दिसतो. 

दरम्यान, ही घटना बर्लिनमध्ये घडलीये. या मुलाचं नाव आहे सिमॉन. 

man played prank with google and hacked google maps

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.