झाकणं चोर अटकेत, दुर्गंधी मिटली..

झाकणं चोर अटकेत, दुर्गंधी मिटली..
Updated on

मुंबई : चोर कुठे, कधी, कशा प्रकारची आणि कोणत्या वस्तूची चोरी करेल काही सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार मुंबईच्या मलबार हिलमध्ये घडलाय. इथे राहणार्‍या रवी कुमार ठाकुर या व्यक्तीने चक्क गटारांचे मॅनहोलची झाकणं चोरी करायचा. मुंबईत मॅनहोलचं झाकण चोरणं हे तसं नवीन नाही. रवी कुमार या व्यक्तीने तब्बल एक नाही दोन नाही तर आतापर्यंत 10 पेक्षा अधिक मॅनहोलची झाकणं चोरली आहेत. मलबार हिल पोलिसांनी त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे आणि त्याला ताब्यात घेतलंय. 

नक्की काय आहे प्रकरण: 

मागच्या काही दिवसांपासून मलबार हिल परिसरात राहणार्‍या नागरिकांकडून गटाराच्या मॅनहोलचं झाकण नसल्याने परिसरात दुर्गंधी होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यासंबंधी पोलिसांनी मुंबई महानगरपालिकेकडे विचारणा केली. यानंतर पोलिसांना ही झाकणं चोरी होत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी यावर तपास सुरू केला. रवी कुमार ठाकुर याला असंच एक झाकण चोरताना एका बंगल्याच्या सुरक्षा रक्षकाने सिसिटीव्हीमधून बघितलं आणि त्वरित त्यांनी पोलिसांना याबाबत कळवले. पोलिसांनी ठाकुर यांचा शोध सुरू केला आणि त्याच्या मुसक्या आवळल्यात. 

का करत होता मॅनहोलच्या झाकणांची चोरी ?

चोर रवी कुमार ठाकुर हा मॅनहोलच्या झाकणांची चोरी करून काही भंगार विक्रेत्यांना विकत असल्याची  महिती पोलिसांना चौकशी दरम्यान मिळाली आहे. रवी कुमारवर रात्रीच्या वेळी या चोऱ्या केल्या जायच्या अशी कबुली त्याने दिलीये. रवी कुमार ठाकुर याच्यासोबत अजूनही दोघे  या चोरीत सामील असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केल्या जातेय.

man who used to steal manhole leads is under arrest by mumbai police


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.