Mumbai News: वांद्र्याच्या प्रतिष्ठित रेस्टॉरंटमध्ये चिकनच्या डिशमध्ये सापडले उंदराचे मांस, गुन्हा दाखल

प्रतिष्ठित रेस्टॉरंटमध्ये चिकन आणि मटणाच्या डिशमध्ये उंदराचे मांस आढळल्याने खळबळ
Mumbai News
Mumbai Newssakal
Updated on

वांद्र्यातील एका प्रतिष्ठित रेस्टॉरंटमध्ये चिकन आणि मटणाच्या डिशमध्ये उंदराचे मांस आढळुन आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर याप्रकरणात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 14 ऑगस्टला हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी मॅनेजर व्हिव्हियन अल्बर्ट शिक्वेरा (वय 40 वर्षे) आणि संबधित रेस्टॉरंटचे आचारी त्याचबरोबर चिकनचा पुरवठा करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Mumbai News
Devendra Fadanvis: पोटनिवडणूकीचे उमेदवार ठरणार? देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

मिळालेल्या माहितीनुसार, 13 ऑगस्ट रोजी अनुराग सिंग (वय 40) हे त्यांचा मित्र अमित यांच्यासोबत वांद्रा पश्चिम येथील पाली नाका येथील रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यांनी रोटीसोबत चिकन आणि मटण थाळीची ऑर्डर दिली. जेवताना त्यांना त्यामध्ये एक मांसाचा तुकडा समोर आला जो वेगळा दिसत होता. जवळून तपासणी केल्यावर तो उंदराच्या मांसाचा तुकडा असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

Mumbai News
Weather Update: राज्यात पावसाचं पुनरागमन; विदर्भासह 'या' ठिकाणी होणार मुसळधार, वाचा हवामान विभागाचा अंदाज

जेवण करत असताना अनुराग सिंग त्यांचा मित्र अमित यांना चिकनच्या डीशमध्ये गडबड असल्याचं लक्षात आलं. यानंतर प्लेटमध्ये निरखून पाहिलं असता ताटात वेगळा मांसाचा तुकडा दिसला. त्यानंतर जवळून तो तुकडा बघितला असता, ते मांस उंदराचे असल्याचे लक्षात आले, हे पाहून अनुराग सिंग आणि अमित यांना धक्का बसला.

यानंतर अनुराग सिंग यांनी वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये भा द वि कलम 272, 336 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

Mumbai News
Satara-Pune highway : पुण्याला जाणारी वाहतूक खंबाटकी घाटातून वळवली; बोगद्यातील अँगल तुटला...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.