Manatralaya News: कामासाठी फेऱ्या मारून कंटाळला; शेवटी ५ व्या मजल्याच्या खिडकीतून उडी मारण्याचा प्रयत्न अन्...,पाहा व्हिडिओ

Manatralaya News: आज मंत्रालयात एक धक्कादायर घटना समोर आली आहे. मंत्रालयात अनेक वेळा आपल्या कामासाठी फेऱ्या मारून देखील काम होत नसल्याने नाराज होऊन एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
Manatralaya News
Manatralaya NewsEsakal
Updated on

आज मंत्रालयात एक धक्कादायर घटना समोर आली आहे. मंत्रालयात अनेक वेळा आपल्या कामासाठी फेऱ्या मारून देखील काम होत नसल्याने नाराज होऊन एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तो व्यक्ती आपल्या कामासाठी वारंवार मंत्रालयात येत होता. मात्र, त्याचं काम होत नसल्याने त्यांनी मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरील खिडकीतील सज्जावर जाऊन बसले. तिथून उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात तो व्यक्ती होता. मात्र तेथील कर्मचाऱ्यांनी व्यक्तीला वाचवलं आहे.

या मजल्यावरील एका खिडकीवर बसून हा व्यक्ती उडी मारण्याच्या प्रयत्नात होता. हा प्रकार जेव्हा मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना समजला तेव्हा, त्यांनी त्याचं मन वळण्याचा प्रयत्न करत त्याला आत्महत्या करण्यापासून रोखलं आहे.

Manatralaya News
Worli Hit And Run Case: वरळी 'हिट अँड रन' प्रकरणी मोठी घडामोड! फरार मिहीर शहाला अखेर अटक

मंत्रालयात आपल्या कामासाठी अनेक चकरा मारून देखील काम होत नसल्याने नाराज होऊन पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. या आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव अरविंद नारायण पाटील असे आहे. शालेय शिक्षण विभागात ते कामानिमित्त आले होते. वारंवार येऊन काम होत नसल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. कराड चिपळून रस्त्यात जागा गेली आहे. त्याबाबत ते आले असल्याचं सांगण्यात येत आहे.

मंत्रालयात पाचव्या मजल्यारील खिडकीतून उडी मारण्याचा करणाऱ्या जेष्ठ नागरिकास क्रेनच्या साहाय्याने खाली उतरवण्यात आलं आहे.

Manatralaya News
Worli Hit & Run Case: 'वरळी हिट अँड रन' प्रकरणातील मृत महिला अभिनेते जयवंत वाडकर यांची सख्खी पुतणी ; "आरोपीला फाशी..."अभिनेत्याने व्यक्त केला संताप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com