amruta fadnavis mangal prabhat lodha
amruta fadnavis mangal prabhat lodhaesakal

Amruta Fadnavis : मॅम नाही तर 'माँ अमृता फडणवीस...'; मंगलप्रभात लोढा यांनी केलं राजकारणात येण्याचं आवाहन ? सूचक वक्तव्य

Mangal Prabhat Lodha On Amruta Fadnavis In Politics: गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी अभिनेता आयुष्मान खुराना वर्सोवा बीचवर स्वच्छता मोहिमेत सहभागी झाला होता.
Published on

गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी वर्सोवा बीचवर अमृता फडणवीस यांच्या दिव्याज फाउंडेशनने स्वच्छता मोहिम आयोजित केली होती.

यावेळी अभिनेता आयुष्मान खुरानाही वर्सोवा बीचवर स्वच्छता मोहिमेत सहभागी झाला होता. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योगपती निरंजन हिरानंदानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान समुद्रकिनारी स्वच्छता मोहिम राबवण्यासाठी अमृता फडणवीस यांनी पुढाकार घेतल्याबद्दल भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अमृता फडणवीस यांचे कौतुक केले. ते यावेळी म्हणाले की, अमृता फडणवीस यांनी राजकारणातील कचराही साफ करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

काय म्हणाले मंगलप्रभात लोढा?

अमृता फडणवीस यांच्या संस्थेने आयोजित केलेल्या या स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले मंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी म्हणाले, "अमृता फडणवीस यांनी आईचे रूप घेतले आहे. त्या मुला-मुलींसाठी जे काम करत आहेत ते कौतुकास्पद आहे. त्यामुळे आजपासून मी त्यांना अमृता मॅडम नाही तर माँ अमृता म्हणणार आहे."

अमृता फडणवीस यांना पुढे लोढा म्हणाले, "तुम्ही चौपाटीवरील कचरा साफ करताय ही चांगली गोष्ट आहे. पण आज राज्यातील राजकारणात जो कचरा झाला आहे, तो साफ करण्यासाठीही तुम्ही पुढाकार घ्यावा."

amruta fadnavis mangal prabhat lodha
भिवंडीत विसर्जनास चाललेल्या गणेशमूर्तीवर दगडफेक; पोलिसांचा लाठीचार्ज, कार्यकर्त्यांकडून 'जय श्रीराम'ची घोषणाबाजी

दरम्यान या स्वच्छता मोहिमेदरम्यान पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस म्हणाल्या "स्वच्छता ही ईश्वरभक्ती आहे हा संदेश आहे. भविष्यात प्रगती करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कचरा न करणे. आणि यातूनच देश पुढे जाईल."

यावेळी उपस्थित असलेले विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, "आपले हक्क आणि जबाबदाऱ्या या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हा या मोहिमेचा संदेश आहे. सण साजरे करण्याचा आपला हक्क बजावला तर तितक्याच जबाबदारीने आपण आपले पर्यावरण वाचवले पाहिजे."

amruta fadnavis mangal prabhat lodha
Ganpati Visarjan: मालाड वेस्टमधील लहान मुलांच्या हॉस्पिटल समोरच दणदणाट; पोलीस मात्र हातावर हात ठेवून?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.