Best worker went on Strike:बेस्टच्या कंत्राटी कर्मचारी पगारवाढ आणि सोयीसुविधा मिळत नसल्याने संपावर गेले होते .बेस्ट कर्मचारी संपावर गेल्याने प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागतोय. त्यानंतर कंपनीने कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली होती. त्यामुळे कर्मचारी आणि कंपनीमधील वाद आणखी चिघळला.
आता या वादावर तोडगा काढण्यासाठी मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मध्यस्थी केली आहे. त्यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या योग्य असल्याचे व्यक्त केले आहे, पण त्याचबरोबर त्यांनी लोकांना त्रास झाल्याचेही मान्य केले. यावेळी त्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर येण्याची विनंती केली. हा प्रश्न २४ ते ४८ तासांमध्ये सुटेल, अशी ग्वाहीही दिली. संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन देखील त्यांनी दिले.
मंगल प्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली . मंगल प्रभात लोढा म्हणाले की, "बेस्टचा संप नाही. आता जो संप आहे तो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा लोकांना त्रास झाला.अनेक मागण्या त्यांच्या होत्या. उद्या पुन्हा एक बैठक होणार आहे. त्यांना पण न्याय मिळावा ही आपल्या सरकारची भुमिका आहे. त्यांच्या मागण्या पण बरोबर आहेत"
यापुढे लोढा म्हणाले की, "आपण १ हजार बसेस सुरु केल्या आहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत. २४ ते ४८ तासांत हा प्रश्न सुटेल. तरीही कर्मचाऱ्यांना हा न्याय देण्याचा प्रयत्न असेल. कंत्राटदारांवर कारवाई केली जाणार नाही कारण बसेस बंद नाहीत कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे व्यवस्था केली जात आहे. कोणावरही कठोर कारवाई करणार नाही. प्रश्न सोडवण्याची मागणी आहे, त्यावर अधिक लक्ष असेल."
मंगल प्रभात लोढा यांनी मत व्यक्त केलं की बेस्ट संपाबाबत जी बातमी आहे, तो बेस्टचा संप नाही. ज्या बसेस वेट लीजवर देण्यात आल्या आहेत,त्या बसेसचे ते ऑपरेटर आहेत. कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे चार ते पाच दिवस लोकांना त्रास झाला आहे. सरकारने वेट लीजवरील ९०० बसेस खाजगी होत्या तिथे बेस्टने आपले कर्मचारी देत वाहतूक पूर्ववत केली आहे. एसटी व स्कूलबस द्वारे ही कमी भरून काढली आहे, अजूनही ४०० बसेस कमी आहेत. ती कमी देखील भरु काढण्यात येईल.
किमान वेतनानुसार वेतन द्यावे, असे आदेश कंत्राटदारांना दिले आहेत. दिवाळी बोनस व इतर मागण्यांवर त्यांची चर्चा झाली. मंगल प्रभात लोढा मंगळवारी (दि.८ ऑगस्ट) पुन्हा चर्चा करणार आहेत.
कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. त्या सोडविण्यासाठी कंत्राटदारांना त्यांनी सांगितले आहे .हा बेस्टचा प्रश्न नाही. कंत्राटदार व त्यांचे खाजगी कर्मचारी यांनी हा प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले आहे पालकमंत्री म्हणून मी मध्यस्थी करत आहे,असे वक्तव्य लोढा यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.