मंगलप्रभात लोढा व नितेश राणे मालवणी पोलिस ठाण्यावर धडकले

मालवणी हा मुस्लिमबहुल विभाग असून या अवैध झोपडपट्टीत गुंडांची दहशतही मोठी आहे. 1992-93 च्या जातीय दंगलीतही येथे मोठा हिंसाचार झाला होता.
Mangalprabhat and Nitesh
Mangalprabhat and NiteshSakal
Updated on

मुंबई - मालवणी विभागात धर्मांध गुंडांकडून हिंदू रहिवाशांना धमकावले जात असल्याचा आरोप करीत भाजप चे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा तसेच आमदार नितेश राणे यांनी मालवणी पोलिस ठाण्यात धडक मारून पोलिसांना कारवाई करण्यास सांगितले.

मालवणी हा मुस्लिमबहुल विभाग असून या अवैध झोपडपट्टीत गुंडांची दहशतही मोठी आहे. 1992-93 च्या जातीय दंगलीतही येथे मोठा हिंसाचार झाला होता. या परिसरात राहणाऱ्या हिंदुंना घरे सोडण्यासाठी धमकावले जाते, असा आरोप यापूर्वीही हिंदुवादी संघटनांनी केला होता. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी लोढा यांनी या परिसराला भेट देऊन तेथील हिंदू रहिवाशांची भेटही घेतली होती. त्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी कारवाईदेखील केली होती.

मात्र त्यानंतरही हिंदूंना धमकावण्याचे प्रकार थांबले नाहीत, अशा तक्रारी आल्याने रविवारी लोढा व नितेश राणे यांनी परिसरातील भाजप नगरसेवकांसह मालवणी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांची भेट घेतली. मर्यादेपेक्षा जास्त जोरात वाजणाऱ्या धर्मस्थळांवरील कर्ण्यांची तक्रार करणाऱ्यांनाही त्रास दिला जातो. कर्ण्यांची तोंड त्यांच्याच घरांच्या दिशेने करून मोठ्या आवाजात ते लावले जातात. वस्ती सोडून निघून जाण्यासाठी हिंदूंना धमकावले जाते, अशा तक्रारी असल्याचे या दोघा आमदारांनी पोलिसांना सांगितले.

Mangalprabhat and Nitesh
आधी परीक्षा रद्द, आता सेंटर लांबचे

घरे सोडण्याच्या धमक्या येतात, घरे सोडावी लागतात याचा अर्थ त्या वस्तीत कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न आहे. याचा अर्थ पोलिस यंत्रणा येथे कुचकामी ठरते आहे, तक्रार केल्यानंतरच पोलिसांनी कारवाई करावी हे अपेक्षित नाही. मागे पोलिसांनी कारवाई केल्यावर हा छळ तात्पुरता थांबला. पण नंतर तो छळ पुन्हा सुरु झाला. हे असे का होते, असा प्रश्न लोढा यांनी पोलिस निरीक्षकांना विचारला. त्यावर या तक्रारींचा आम्ही तपास करू, असे उत्तर निरीक्षकांनी दिल्याने राणे यांचा पारा चढला.

आम्ही दोघे आमदार येथे आलो याचा अर्थ काहीतरी गंभीर प्रकरण आहे हे पोलिसांनी ध्यानात घेऊन कारवाई करावी. आम्ही या भेटीची माहिती विधीमंडळातही देणार आहोत. आम्ही गुन्ह्यांचे पुरावे देत आहोत, तक्रारदारांना तुमच्यासमोर उभे केले आहे, तरीही तुम्ही फक्त तपास करू असे म्हणता हे योग्य नाही. तुम्ही गुंडांविरुद्ध थेट गुन्हा नोंदवा, असे राणे यांनी सुनावले. अखेर याप्रकरणी कारवाईचे आश्वासन पोलिसांनी दिल्यावर, एकदा तुमच्यावर विश्वास ठेऊन आम्ही वाट पाहू. मात्र पुन्हा काही अनुचित प्रसंग घडल्यास आम्ही येथे येणार नाही. जे काय करायचे ते आम्ही बाहेर करू, असा इशाराही राणे यांनी दिला. या भेटीसंदर्भात राणे व लोढा यांनी ट्वीटच्या माध्यमातून माहिती दिली असून वरील संभाषणाचे व्हिडियो देखील त्यांच्यातर्फे समाजमाध्यमांवर प्रसिद्धीस देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.