स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख केंद्र

मुंबईतील ग्रँड रोड परिसरात असलेले ‘मणिभवन’ प्रमुख केंद्र बनले होते
Mumbai
Mumbai Sakal
Updated on

मुंबईतील ग्रँड रोड (Grant Road) परिसरात असलेले ‘मणिभवन’ (Mani Bhavan) हे भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीतील (Indian independence movement) प्रमुख केंद्र बनले होते. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी स्वातंत्र्य चळवळीच्या काळात तब्बल १७ वर्षे याच मणिभवनमध्ये राहून ‘सत्याग्रहाची मशाल’ पेटवली होती. स्वातंत्र्याच्या चळवळीच्या (independence movement) एकूणच रचनात्मक कार्याची सुरुवात (Start) येथून झाल्याने याच भवनमधून गांधीजींनी असहकार, सविनय कायदेभंग, दांडी यात्रा आदी आंदोलने (Andolan) सुरू केली. या आंदोलनाच्या बैठकाही येथूनच झाल्या होत्या. त्यामुळे हे मणिभवन (Mani Bhavan)खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य चळवळीचे मोठे केंद्र (Big Center) ठरले होते, अशी माहिती मणिभवनच्या अध्यक्षा डॉ. उषा ठक्कर (Dr.Udha Thakkar) यांनी दिली. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. ठक्कर (Dr. Thakkar) यांनी ‘सकाळ’शी संवाद साधत मणिभवनाचा इतिहास (History) कथन केला.

मणिभवन मध्ये प्रवेश करताच भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अनेक घडामोडींचा इतिहास उलगडतो. इतकेच नव्हे, तर मुंबईमध्ये भारतीय स्वातंत्र्याचे आणि विशेषत: महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या स्वातंत्र्य आंदोलनाची साक्ष हे मणिभवन देते. त्यासाठीची असंख्य कागदपत्रे, लाखोंच्या संख्येने विविध भाषेतील पुस्तके, दस्तावेज या ठिकाणी संग्रहित आहेत. याच ठिकाणी दुसऱ्या मजल्यावर महात्मा गांधी राहत असलेल्या खोलीत त्यांनी वापरलेल्या वस्तूंमध्ये सूतकताईचे चरखे, फोन, टेबल आदी वस्तू जतन केल्या आहेत. येथील अनेक वस्तू पुढे दिल्‍ली येथे असलेल्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयातही ठेवण्यासाठी देण्यात आल्या आहेत. त्यांच्या काही प्रतिकृती मणिभवनमध्ये पाहावयाला मिळतात.

Mumbai
ज्येष्ठ गायिका जगजीत कौर यांचे निधन

मणिभवनमध्ये महात्मा गांधी पहिल्यांदा १९१५ साली आले होते. त्यानंतर त्यांनी भारतभ्रमण करून १९१७ ते १९३४ या कालावधीमध्ये सर्वाधिक काळ मणिभवनमध्ये घालवला. या ठिकाणी महात्मा गांधीजींना माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि असंख्य नेत्यांनी भेटी दिल्या होत्या. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी याच ठिकाणी गांधी यांनी ‘टिळक स्वराज्य फंडा’ची सुरुवातही केली होती. तसेच देशातील असंख्य व्यक्ती, नेत्यांशी पत्रव्यवहार केला होता. त्याचे अनेक दस्तावेज मणिभवनमध्ये उपलब्ध असल्याचे मणिभवनच्या अध्यक्षा डॉ. उषा ठक्कर यांनी सांगितले. गांधीजींनी सुरू केलेल्या ‘यंग इंडिया’ व ‘नवजीवन’ साप्ताहिकांच्या प्रती मणिभवनमध्ये संग्रहित करण्यात आल्या आहेत.

Mumbai
मुंबई अग्निशमन दलातील 8 जवानांना राष्ट्रपती पदक जाहीर

‘मॅजिक ऑफ महात्मा’

महात्मा गांधी यांच्या अनेक आठवणी मणिभवनच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ठेवलेला दस्तावेज, फोटो यातून जाग्या होतात. याच ठिकाणी महात्मा गांधी यांनी १९१७ मध्ये पिंजाऱ्यांकडून कापूस पिंजण्याचे धडे घेतले होते. येथूनच सूतकताई करण्यास शिकले. याच दरम्यान त्यांची तब्येत खालावली होती. त्यामुळे कस्तुरबा गांधी यांच्या आग्रहामुळे त्यांनी बकरीचे दूध घेण्यास पहिल्यांदा सुरुवात केली होती. अशा अनेक आठवणी मणिभवनशी जोडलेल्‍या असून येथूनच ‘मॅजिक ऑफ महात्मा’ कळतो, असेही डॉ. ठक्कर म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.