मुंबई : राजशिष्टाचार विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या शासकीय परिवहन सेवेतील (जिटीएस) राज्य अतिथींच्या वाहनांचा बेकायदेशीर वापर करून त्या वाहनांमधीला पार्ट वारंवार कारण नसतांना बदलवण्यात आल्याचा धक्कादायक अहवाल पुढे आला आहे.
जिटीएसचे तत्कालीन नियंत्रक किशोर गायकर यांनी त्यांच्या कार्यकाळात राज्य अतिथींच्या वाहनांचा गैरवापर करत माया जमवल्याचा आरोप जिटीएसच्या चालक संघंटनेनेच आरोप लावला होता. त्यावरून गायकर यांच्यावर दोषारोप पत्र दाखल करून त्यांच्याविरुद्धा चौकशी सुरू केली होती.
दरम्यान परिवहन विभागाला तांत्रीक चौकशीचे आदेश परिवहन विभागातील मोटार वाहन निरिक्षक सुनिल देशमुख यांना दिले होते. त्यांचा गोपनीय अहवाल सकाळच्या हाती लागला आहे. सकाळ ने राज्य अतिथींच्या वाहनांच्या बेकायदा वापरण्याचे प्रकरण उघड केले होते. त्यानंतर राजशिष्टाचार विभागाने तत्कालीन संचालक सतीश जोंधळे आणि नियंत्रक किशोर गायकर यांच्या विरुद्धा चौकशीचे आदेश दिले होते.
जिटीएस नियंत्रकांचा कारभार तांत्रीक अधिकाऱ्यांकडे राहण्याची गरज असतांना अतांत्रीक व्यक्तींकडे नियंत्रकांचा प्रभार सोपवण्यात आला होता. परिणामी गायकर आणि जोंधळे यांच्यावरील आरोपातील सत्यता पडताळणीसाठी परिवहन विभागाला तांत्रीक तपासणीचे आदेश दिले होते.
मात्र, ज्यामध्ये एकूण ४२ वाहनांची १ मे ते २०१९ ते ३१ नोव्हेंबर २०२१ पर्यंत करण्यात आलेल्या वारंवार दुरूस्ती, बदलवण्यात आलेले सुटे भाग खरेदीती तपासणी करायचे होते. मात्र, फक्त ७ वाहनांचीच तपासणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये अनेक गंभीर बाबी उघड होतांना दिसून येत असल्याचे देशमुख यांनी आपल्या चौकशी अहवालात सांगितले आहे.
अहवालातील खुलासे
वाहनांमध्ये एकाच प्रकारची दुरूस्ती वारंवार केली आहे.
बदलण्यात आलेले भाग व देयके स्टोअर मधील नोंदवही अथवा पुठवठादाराची बिलांमध्ये भागांच्या पार्ट नंबरांच्या नोंदी नाही.
मागवण्यात आलेल्या भागांचे पार्ट नंबर नोंदविण्याबद्दलची प्रक्रियाच केली नाही.
वापरण्यात आलेले पार्ट नवेच वापरले असेल याची शाश्वती नाही.
वाहनांची दोन वर्षांमधील ७ वाहनांची दुरूस्ती प्रमाणापेक्षा जास्त झाली आहे.
४ मे २०१९- ३० नोव्हेंबर २०२१ एका वर्षात वाहनांवर झालेला अवाजवी खर्च
एमएच१एएन८३८४ स्कोडा या वाहनावर 3 लाख 9 हजार
एमएच१एन९०९१ स्कोडा यावर ४ लाख १3 हजार
एमएच १ एन ९२९३ यावर 3 लाख 35 हजार
एमएच १ एन १७०७ यावर १ लाख ५२ हजार
एमएच १ एन १७०८ यावर १ लाख १७ हजार
एमएच १ एन ४८४९ यावर ३ लाख ५७ हजार
एमएच १ सीपी २३९१ यावर १ लाख ४१ हजार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.