- दिनेश चिलप मराठे
Mumbai News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील नवी मुंबईतून आझाद मैदानाकडे कूच करणार होते. मात्र तूर्तास त्यांनी राज्य सरकारला उद्यापर्यंतची (शनिवार) मुदत दिली आहे.मात्र दुसरीकडे सकाळपासून कार्यकर्त्याचे जत्थेच्या जथ्ये आझाद मैदानावर दाखल होत होते.
मुंबई, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यातून या ग्रामीण आंदोलकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज कि जय, तुमचे अमुचे नाते काय जय जिजाऊ जय शिवराय अशा गगनभेदी घोषणा दिल्या जात होत्या.
दुपारपर्यंत आझाद मैदानात काही हजार संख्येने आंदोलक उपस्थित होते. शिस्तबद्ध पद्धतीने रांगा लावत वाहनातून आणलेली भाजी भाकरी आणि मिर्चीचा ठेचा,व्हेज पुलाव यांचे पाण्याच्या बाटल्या सहित शिस्तबद्ध वाटप करण्यात येत होते.
कोकण कम्युनिटी फोरमचे अब्दुल मतीन खान, खाटीक जमात प्रेसिडेंट शहानवाज ठाणावाला यांच्या नेतृत्वात आलेल्या मुस्लिम बांधवानी आम्ही शिवकालापासून मराठा सोबतच आहोत. त्यामुळे त्यांना आरक्षण मिळावे अशीच आमचीही मागणी असल्याने त्यांना उघड पाठींबा देण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत असे त्यांनी म्हटले
आज मुंबईत भगवे वादळ धडकणार अशा खात्रीमुळे पोलिसांचा दक्षिण मुंबईत मोठा बंदोबस्त पहायला मिळत होता.मेट्रो सिग्नल जवळ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तावर होते. तर आझाद मैदान परिसरात 1200 पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे.
अतिरिक्त आयुक्त डॉ.अभिनव देशमुख,उपायुक्त डॉ.प्रवीण मुंडे ACP मृत्युंजय हिरेमठ, कैलास आव्हाड,निरीक्षक सुरेश माने, कृष्णा मापारी, उपनिरीक्षक अरुण गायकवाड,महिला सहायक निरीक्षक सारिका निकम, प्रतिभा येखण्डे, पाटील, सहायक उपनिरीक्षक सुनील साठे यांचेसह जवळपास 100 महिला पोलीस अंमलदार आणि 200 अधिकारी सुरक्षा व्यवस्था सांभाळत आहे.
मनोज दादांच्या संघर्षामुळे आमच्या मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण मिळाल्यास आमच्या विदयार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न सुटेल. शिक्षण, नोकरी आणि व्यवसायात मोठी मदत होईल. बेरोजगारीचा प्रश्न सुटेल.शिवाय युपीएस्सी आणि एमपीएससीच्या परीक्षेत आम्हाला जागा मिळतील.परीक्षा पास झाल्या नंतर देशसेवेत जाण्याचा मार्ग प्रशस्त होईल
- भारवी माने, गोरेगाव पूर्
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.