Manoj Jarange Mumbai Rally: जरांगेंच्या मुंबईतील उपोषणासाठी 'या' मैदानची निवड? शिष्टमंडळानं घेतला आढावा

मनोज जरांगेंच्या मुंबईतील उपोषणासाठी जागेच्या पाहणीकरीता शिष्टमंडळानं मुंबईत जाऊन पाहाणी केली.
Maratha Reservation   Manoj Jarange-Patil
Maratha Reservation Manoj Jarange-Patilesakal
Updated on

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता मुंबईत उपोषणाचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. याच्या पाहणीसाठी जरांगेंच्या शिष्टमंडळानं मुंबईत जाऊन पाहाणी केली. या पाहणीनंतर ज्या तीन मैदानांचा पर्याय होता त्यांपैकी आझाद मैदान हेच ठिकाण उपोषणासाठी योग्य असल्यानं त्यालाच पसंती असल्याची माहिती कळते आहे. टीव्ही ९ मराठीनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Manoj Jarange Mumbai hungar strike Choice of Azad Maidan may finalise delegation took a review)

Maratha Reservation   Manoj Jarange-Patil
JDU New President: लल्लन सिंह यांचा अखेर राजीनामा! नितीश कुमार बनले जेडीयूचे अध्यक्ष

तीन मैदानांचा पर्याय

शिवाजी पार्क, आझाद मैदान आणि बीकेसी मैदान या तीनपैकी एक ठिकाण मुंबईतल्या आंदोलनासाठी विचाराधीन आहे. या तिन्ही मैदानांची पाहाणी शिष्टमंडळाकडून केली जात आहे. यांपैकी दादर येथील शिवाजी पार्क मैदान, यानंतर आझाद मैदान तर बीकेसी मैदानाची पाहणी करण्यात आली. यांपैकी या शिष्टमंडळा शिवाजी पार्क आणि बीकेसीपेक्षा आझाद मैदानचं उपोषणासाठी आणि सहभागी आंदोलकांसाठी जास्त सोयीचं असल्याची चर्चा आहे. (Marathi Tajya Batmya)

Maratha Reservation   Manoj Jarange-Patil
Admirals Epaulettes: शिवरायांची प्रेरणा! भारतीय नौदलात अ‍ॅडमिरल रँकच्या अधिकाऱ्यांचे बॅज बदलले

अंतिम निर्णय जरांगे घेणार

दरम्यान, या सभास्थळांची संपूर्ण पाहाणी केल्यानंतर हे शिष्टमंडळ आंतरावाली सराटीला जाऊन पुन्हा मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत. त्यानंतर त्यांच्यासमोर सर्व परिस्थिती मांडून मग यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

Maratha Reservation   Manoj Jarange-Patil
Traditional Medicine: विष उतरवणाऱ्या, निखळलेली हाडं बसवणाऱ्यांना मिळणार अधिकृत परवाना; केंद्र निर्णय घेण्याच्या तयारीत

...तर जरांगे उपोषणावर ठाम

मनोज जरांगे हे २० जानेवारी रोजी मुंबईतील उपोषणावर ठाम आहेत. तर दुसरीकडं सरकारनं त्यांना थोडा संयम ठेवण्याचं आवाहन केलं आहे. पण सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत तर मुंबईत लाखो-करोडो संख्येनं मराठा समाज दाखल होईल, यासाठी आंदोलकांच्या सोयी-सुविधांची काळजी सरकारनं घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.