मनोज जरांगेंच्या आंदोलनाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सदावर्तेंना हायकोर्टाचा दणका, दिले 'हे' निर्देश

मनोज जरांगे यांचा अंतरवाली सराटी ते मुंबई असा पायी मोर्चा सुरु झाला आहे. आज ते पुण्यात आहेत. येत्या २६ जानेवारीला जरांगे मराठा आरक्षणासाठी मुंबईत आमरण उपोषण करणार आहेत.
Manoj Jarange Maratha Mumbai Morcha
Manoj Jarange Maratha Mumbai Morcha
Updated on

Manoj Jarange Maratha Mumbai Morcha

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर गुणरत्न सदावर्तेंना दुसऱ्या खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला विरोध करत सदावर्तेंनी मुंबईत न्यायालयात याचिका दाखल केली होती.

याचिकेवर सुनावणीस हायकोर्टातील मुळ खंडपीठाने नकार दिला आहे. मनोज जरांगे यांचा अंतरवाली सराटी ते मुंबई असा पायी मोर्चा सुरु झाला आहे. आज ते पुण्यात आहेत. येत्या २६ जानेवारीला जरांगे मराठा आरक्षणासाठी मुंबईत आमरण उपोषण करणार आहेत. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना आव्हान केलं आहे.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना संयम राखण्याची विनंती केली आहे. मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असल्यामुळे आंदोलनाची गरज नाही, असे शिंदे म्हणाले.

Manoj Jarange Maratha Mumbai Morcha
Ayodhya Crowd News: अयोध्येला जाताय तर थांबा! गर्दीमुळे योगी प्रशासनाचा मोठा निर्णय

एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने दिला आहे. ओबीसी समाज व इतर समाजाचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे.  जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार कुणबी नोंदी शोधल्या त्यानुसार जातप्रमाण पत्राचे वाटप सुरु आहे.

दिड लाख लोक प्रमाणपत्र देण्याचे काम करत आहे. तीन शिफ्टमध्ये लोक काम करत आहेत. कुणबी नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. आणखी नोंदी शोधण्याचे काम देखील सुरु आहे. सरकार अधिवेशन घेऊन कायदा करणार आहे, असे शिंदे म्हणाले. (Latest Marathi News)

Manoj Jarange Maratha Mumbai Morcha
Shiv Sena Thackeray Group News: रावणशाहीसमोर झुकणार नाही; शिवसेनेच्या अधिवेशनात राऊत, अंधारे यांची सडकून टीका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.