Manoj Jarange: आझाद मैदान नको तर...; मुंबई पोलिसांनी उपोषणासाठी जरांगेंना दिला नवा पर्याय

जरांगेंचा मुक्काम सध्या लोणावळ्यात आहे, यानंतर वाशी आणि शेवटी आझाद मैदानात ते पोहोचणार आहेत.
Manoj Jarange patil
Manoj Jarange patilSakal
Updated on

मुंबई : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं यासाठी मनोज जरांगे मुंबईतील आझाद मैदानाकडं निघाले आहेत. पण आता हायकोर्टाच्या आदेशानंतर आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगेंना मुंबई न येण्यासाठी नोटीस पाठवली आहे. आझाद मैदानाऐवजी त्यांना नवा पर्यायही पोलिसांनी दिला आहे. (Manoj Jarange notice by Mumbai Police he should not come to Azad Maidan said in notice)

Manoj Jarange patil
Nitish Kumar: नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार? ममतांनंतर बदलला काँग्रेसबाबतचा सूर

पोलिसांच्या नोटिशीत काय म्हटलंय?

१) मनोज जरांगेंनी मुंबईत येऊ नये.

२) आंदोलनामुळं मुंबईतलं जनजीवन विस्कळीत होईल.

३) पनवेलच्या खारघरमधील मैदानात जरांगेंनी आंदोलन करावं.

४) मुंबईतल्या कुठल्याही मैदानात एवढे आंदोलक बसू शकतात एवढी क्षमता नाही.

५) आंदोलनामुळं मुंबईत वाहतुकीची समस्या आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल.

६) दादरच्या शिवाजी पार्क आणि आझाद मैदानात उपोषणाची परवानगी नाकारण्यात येत आहे.

पोलिसांनी 'हा' दिला नवा पर्याय

मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंना आझाद मैदान आणि शिवाजी पार्क ऐवजी नवी मुंबईतील खारघर इथल्या मैदानात आंदोलन करावं, हा पर्याय दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.