Manoj Jarange Patil: जरांगेंची भाषा राजकीय, त्यांच्या मागण्या सतत बदलत गेल्या, मर्यादेत राहा; मुख्यमंत्री शिंदेंचा स्पष्ट भाषेत इशारा!

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर राज्य सरकारवने रोखठोख भूमिका घेतली आहे. प्रत्येकाने मर्यादेत राहीलं पाहीजे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितलं आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilesakal
Updated on

Manoj Jarange Patil:  मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर राज्य सरकारने रोखठोख भूमिका घेतली आहे. प्रत्येकाने मर्यादेत राहीलं पाहीजे, असे मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितलं. 

प्रत्येकाने मर्यादेत राहिलं पाहिजे. जरांगे यांचे आरोप खालच्या पातळीवरचे आहे. गृह विभाग या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. कोणी जर परिस्थिती बिघडवली तर कुणालाही माफ करणार नाही, असा इशारा शिंदेंनी दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कायदा सुव्यस्था राखण्याचा जबाबादारी आमची आहे. सरकारने केलेल्या कामाची जाणीव आंदोलनकर्त्यांनी ठेवली पाहीजे. कोर्टानं दाखवलेल्या त्रुटी आम्ही दूर केल्या. आरक्षण कोर्टात टिकेल ही जबाबदारी आमची आहे. सगेसोयऱ्यांबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. जो शब्द आम्ही दिला तो पाळला आहे. 


मनोज जरांगे यांच्या मागण्या सतत बदलत गेल्या. मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी प्रमाणिक भावना मनामध्ये ठेऊन लढ्यामध्ये उतरले, अशी भावना आमची होती. त्यामुळे जस्टीस शिंदे कमिटी केली. कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हत, ते दिलं. त्यानंतर मागणी आली सरसकट द्या, त्यांनतर राज्यात व्याप्ती वाढवा म्हणाले ते आम्ही केलं. आता सगेसोयऱ्यांची मागणी आली. त्यावर नोटीफिकेशन काढलं, त्यावर हरकती आल्या आहेत. त्यांनी ओबीसीमधून आरक्षण द्या म्हणाले. वेळोवेळी मागण्या बदलत गेल्या.

Manoj Jarange Patil
Ravi River Water: आर्थिक संकटाशी झुंजणारा पाकिस्तान पाण्यासाठी आसुसणार, रावी नदी पाणी प्रवाह पूर्णपणे बंद

मनोज जरांगे यांना भेटायला मी जालन्यात गेलो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ५६ मोर्चे झाले. ते शांततेत झालं. पण यावेळेस कुठं आग लावली, कुठं दगडफेक झाली हे सर्व कोणी केलं?. पण मराठा समाज सयंमी पण जे आंदोलनाला गालबोट लावत आहेत, त्यांच्यापासून मराठा समाजाने सावध राहावं. मी मुख्यमंत्री असताना अंहकार ठेवला नाही. पण मनोज जरांगेंची भाषा आता राजकीय वाटत आहे. त्यामागे कोणीतीरी बोलत आहे. सरकारने घेतलेल्या निर्णय विचार करुन घेतला आहे, असे शिंदे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत जे बोलले ती आपली संस्कृती नाही आहे. खालच्या भाषेत टीका करण्यात आली. जरांगे यांनी कुणीतरी शब्द लिहून दिले, हे महाराष्ट्र सहन करत नाही, असे शिंदे म्हणाले.  

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil: "उद्धव ठाकरे अन् शरद पवारांचे विषय..."; मनोज जरांगेंच्या आरोपावर फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.