Manoj Jarange Patil News: मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली; जरांगे म्हणतात, 'आझाद मैदानात स्टेज तयार'

Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनासाठीची परवनागी मुंबई पोलिसांनी नाकारली आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilesakal
Updated on

मुंबई- मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनासाठीची परवानगी मुंबई पोलिसांनी नाकारली आहे. आंदोलन करावं इतकी आझाद मैदानाची क्षमता नाही असं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे आता काय निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे.( Manoj Jarange Patil News Permission denied for protest at Azad Maidan maratha reservation andolan)

पोलिसांनी आयोजकांना दिलेल्या पत्रात म्हटलंय की, खेळासाठी राखीव असलेल्या मैदानात उपोषणाला परावानगी नाही. शिवाय आझाद मैदानाची इतकी क्षमता नाही की, इथे मोठे आंदोलन होऊ शकेल. त्यामुळे जरांगे पाटील यांनी नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर २९ मधील इंटरनॅशल कॉर्पोरेशन पार्क मैदान येथे आंदोलन करावं. दुसरीकडे, आझाद मैदानावर मराठा आयोजकांकडून तयारी सुरु झाली आहे.

Manoj Jarange Patil
Maratha Reservation : आता जगायचे ते मराठ्यांच्या लेकरांसाठीच- मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

मुंबईकर, आमचे हाल होऊ नयेत असं वाटत असेल तर सरकारनं तोडगा काढवा. आम्ही पण ऊन, वाऱ्यात आहोत, आमचेपण हाल सुरु आहेत. सरकारचं शिष्टमंडळ नाही, काही अधिकारी भेटायला आले होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भेटायला यावं. तेच तेच मुद्दे सांगितले जात आहेत. आम्हाला विजयाचा गुलाल उधाळायचा आहे, असं जरांगे पाटील म्हणाले.

आझाद मैदानात तयारी झाली आहे. स्टेज तयार झालं आहे. आम्हाला सरकारला सहकार्य करायचं आहे. त्यामुळेच आम्ही लोणावळ्यात थांबलो आहे. काही मंत्री आणि सचिव चर्चेसाठी येण्याची शक्यता आहे. शिष्टमंडळ जिथे म्हणेल, तिथं चर्चा करु. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तोडगा काढवा. मुंबईला आम्हाला येण्याची हौस नाही, असं जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil
अंगावर गोळ्या झाडल्या तरी, OBC मधूनच मराठ्यांना आरक्षण घेणार; वाघोलीत मनोज जरांगेंचा स्पष्ट इशारा

आज बंद दाराआड चर्चा केली नाही. काहीही अफवा पसरवू नका. अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. माहिती देण्यासाठी ते आले होते. माझ्या समाजाला काही अडचण नाही मग तुम्हाला काय अडचण आहे. आमच्या बांधवांनी आझाद मैदानाची परवानगी मिळाल्याचं सांगितलं आहे. नोटीस मी वाचली नाही. पण, परवानगी मिळाल्याचं मला सांगण्यात आलंय. आम्ही आझाद मैदानाला जाणार आहोत, असं वक्तव्य त्यांनी केलं. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.