मुंबई: अँटिलिया स्फोटक प्रकरण (Antilia Explosives Case) आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण (Mansukh Hiren Murder Case) अशा दोन प्रकरणात सक्रीय सहभाग असल्याच्या आरोपाखाली एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना NIA कडून अटक करण्यात आली. प्रदीप शर्मा यांनी सचिन वाझेसोबत एकत्र येऊन स्फोटक प्रकरण आणि मनसुख हत्या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली असाही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तशातच, अँटिलिया प्रकरणातील आरोपी निलंबित पोलीस सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरूनच मनसुख हिरनची हत्या केली, असा जबाब या प्रकरणातील दोन आरोपींनी दिल्याचा दावा NIA ने विशेष न्यायालयात केला. (Mansukh Hiren was Murdered as per orders of Sachin Waze and Pradeep Sharma claims NIA)
आरोपी शर्मासह, संतोष शेलार आणि सुनील माने यांना विशेष न्या पी आर सित्रे यांनी ता. 25 पर्यंत एनआयए पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपींनी दिलेल्या माहितीबाबत तीनही आरोपींची एकत्र चौकशी करायची आहे, त्यामुळे रिमांड हवा, असे तपास यंत्रणेकडून न्यायालयात सांगण्यात आले. तवेरा कारमध्ये सतीश उर्फ टन्नी भाई आणि मनीष सोनी यांनी शेलार आणि मानेसह हिरनची.हत्या केली आणि ठाणे खाडीमध्ये म्रुतदेह फेकून दिला, असा जबाब शेलार आणि मानेने दिला आहे, असे एनआयएकडून सांगण्यात आले. शर्माला दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली तर सतीश आणि मनीषला मागील आठवड्यात अटक झाली आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून शर्मा आणि वाझे पोलीस दलात ओळखले जातात.
शर्माला त्याच्या वकिलांना रोज वीस मिनिटे भेटण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. आतापर्यंत या प्रकरणात दहाजणांना अटक झाली आहे. दक्षिण मुंबईमध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या एंटिलिया निवासस्थानाबाहेर ता 25 फेब्रुवारीला जिलेटीन कांड्या असलेली गाडी पोलिसांना आढळली होती. ही गाडी ठाण्यात राहणारे हिरन यांच्या ताब्यात होती. काही दिवसानंतर ता 5 मार्चमध्ये त्यांचा म्रुतदेह ठाण्याच्या खाडीत सापडला होता. त्यानंतर पोलीस तपास करत असताना एनआयएने वाझेला अटक केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.