Manugraph India Company चे संस्थापक सनतभाई शहा यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन

मुद्रण व्यवसायाची पंढरी असा कोल्हापूरचा झाला लौकिक
Manugraph India Company Chairman Sanatbhai Shah Passed Away
Manugraph India Company Chairman Sanatbhai Shah Passed Awayesakal
Updated on
Summary

कंपनीचे सध्याचे चेअरमन संजय शहा व व्हाईस चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक प्रदीप शहा यांनी त्यांचीच परंपरा पुढे सुरू ठेवली आहे.

कोल्हापूर : येथील मनुग्राफ इंडिया कंपनीचे (Manugraph India Company) संस्थापक अध्यक्ष सनतभाई शहा (वय ९२) यांचे शुक्रवारी पहाटे मुंबई येथे वृद्धापकाळाने निधन झाले.

वृत्तपत्र मुद्रण व्यवसायासाठी वेगवान कोरोसेट तंत्रज्ञान त्यांनी (Sanatbhai Shah) देशात आणले आणि निरंतर संशोधनाच्या माध्यमातून त्यामध्ये आधुनिकता आणली. त्यांच्यामुळेच ‘मुद्रण व्यवसायाची पंढरी’ असा कोल्हापूरचा लौकिक झाला.

Manugraph India Company Chairman Sanatbhai Shah Passed Away
मोठी बातमी! साताऱ्यात एक लाखाची लाच घेताना दोन पोलिस अधिकाऱ्यांना अटक; 'अवैध दारू'प्रकरणी केली होती लाचेची मागणी

शहा यांनी कंपनी स्थापन करताना उपलब्ध कुशल मनुष्यबळ व पोषक वातावरण याचा अभ्यास करून विश्‍वासाने कोल्हापूरची निवड केली होती. १९७२ मध्ये येथील शिरोली एमआयडीसीमध्ये मशिनेन फॅब्रिक पॉलिग्राफ इंडिया लिमिटेड (आताची मनुग्राफ इंडिया) या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली.

वेब पॉलिग्राफ या तत्कालीन पूर्व जर्मनीमधील कंपनीच्या सहकार्याने विविध मशिनच्या माध्यमातून ऑफसेट तंत्राची ओळख देशाला करून दिली. पुढे १९८८ मध्ये प्लामाग प्लूएन जर्मनी यांच्याशी संयुक्तपणे तर त्यानंतर ‘मनुग्राफ इंडिया’ या कंपनीच्या माध्यमातून अत्याधुनिक वृत्तपत्र छपाई यंत्रांचे उत्पादन त्यांनी सुरू केले.

Manugraph India Company Chairman Sanatbhai Shah Passed Away
Vikram Pavaskar : स्वातंत्र्यदिनी तिरंग्याशेजारी आता भगवा ध्वजही उभारा; भाजप नेत्याचं धक्कादायक आवाहन, वादाची शक्यता

वृत्तपत्र क्षेत्रात देशात त्यांनी एक नवा अध्याय निर्माण केला. त्यांच्या कल्पक आणि दूरदृष्टीच्या नेतृत्वाने ‘मनुग्राफ’च्या उत्पादनांना जगभरात लोकप्रियता मिळाली. कंपनीचे सध्याचे चेअरमन संजय शहा व व्हाईस चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक प्रदीप शहा यांनी त्यांचीच परंपरा पुढे सुरू ठेवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()