Deepak Kesarkar: अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक घेतले जाणार नाहीत; मंत्री दीपक केसरकरांचे आश्वासन

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक घेण्याच्या विषयाला पूर्णविराम मिळालेला आहे |The issue of including Manusmriti verses in the school curriculum has been put to rest
Deepak Kesarkar: अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक घेतले जाणार नाहीत; मंत्री दीपक केसरकरांचे आश्वासन
Deepak Kesarkarsakal
Updated on

Deepak Kesarkar: शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्यास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तीव्र विरोध केला आहे. (shloke from Manusmriti in school)

याविरोधानंतर शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक घेतले जाणार नसल्याचे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना दिले आहे.त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक घेण्याच्या विषयाला पूर्णविराम मिळालेला आहे.(maharashtra News)

Deepak Kesarkar: अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक घेतले जाणार नाहीत; मंत्री दीपक केसरकरांचे आश्वासन
Deepak Kesarkar : मंत्री दीपक केसरकरांसह 13 जणांना बंदुका जमा करण्याचे आदेश

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यांसंदर्भता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून मनुस्मृती चे श्लोक अभ्यासक्रमात घेण्याबाबत तीव्र विरोध दर्शविला. (marathi news)

यावेळी दोघांमध्ये झालेल्या चर्चेत दीपक केसरकर यांनी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक येणार नसल्याचे ठोस आश्वासन रामदास आठवले यांना दिले आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले आहे.(dr babasaheb ambedkar)

Deepak Kesarkar: अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक घेतले जाणार नाहीत; मंत्री दीपक केसरकरांचे आश्वासन
Deepak Kesarkar : शिंदे सरकारचे काम हेच आमचे बळ

जातीभेद विषमता आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या भेदभावाच्या अनेक बाबी मनुस्मृतिमध्ये असल्यामुळे मानवतेच्या हक्कासाठी; विषमता आणि जातीभेदाच्या अमानुष रूढी परंपरे विरुद्ध संगर म्हणून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे मनुस्मृती चे दहन करून सामाजिक क्रांति केली.(Inequality and caste discrimination)

त्यामुळे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जाळलेल्या मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमात घेण्यास आंबेडकरी जनतेचा तीव्र विरोध असल्याचे रामदास आठवलेंनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना दूरध्वनी द्वारे सांगितले.त्यावर ना.दीपक केसरकर यांनी मनुस्मृती चे श्लोक अभ्यासक्रमात घेणार नसल्याचे आश्वासन ना. रामदास आठवलेंना दिले.

Deepak Kesarkar: अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक घेतले जाणार नाहीत; मंत्री दीपक केसरकरांचे आश्वासन
Deepak Kesarkar : सरकार 'काजू बी'ला 135 रुपये दर देणार; मंत्री केसरकरांच्या 'या' धोरणाला बागायतदारांचा तीव्र विरोध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.