अनेक रूग्णांमध्ये अँटीबॉडीजची निर्मिती नाही, कोरोनामुक्त झाल्यानंतरही अशी घ्या काळजी

अनेक रूग्णांमध्ये अँटीबॉडीजची निर्मिती नाही, कोरोनामुक्त झाल्यानंतरही अशी घ्या काळजी
Updated on

मुंबई - कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असतानाच  कोरोना आजारातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. असे असले तरी जे रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत त्यांच्या शरीरात विषाणूच्या विरोधात लढण्यासाठी आवश्यक अँटीबॉडी तयार होत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रुग्णालयातून घरी गेल्यानंतरही रुग्णांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

कोरोना आजारातून बरे होणा-या रूगणांची संख्या वाढत असून रुग्ण बरे होण्याचा दर 81 टक्के इतका आहे. असं असलं तरी त्यातील अनेक रूग्णांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या नसल्याचे समोर आले आहे.

प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाच्या शरीरात आवश्यक अँटीबॉडीज तयार होतीलच असे नाही. यातील काही व्यक्ती पुन्हा आजारातून मुक्त झालेल्या रुग्णांना मास्क घालणे, योग्य शारीरिक अंतर राखणे तसेच आपल्या आहाराकडे लक्ष देणे फार महत्वाचे असल्याचे इंडीयन मेडीकल असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे सांगतात.

कोरोना संसर्गाने बाधित झालेल्या रुग्णाने विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. खास करून रूग्णांनी व्यसनापासून लांब राहणे गरजेचे आहे. अल्कोहोलपासून लांब असणाऱ्या रुग्णांना या आजारातून वाचवणे शक्य असते. याशिवाय आपल्या खाण्या-पिण्याकडे लक्ष देणे आवश्यक असून सकस आहार घेणे गरजेचे असल्याचे डॉक्टर सांगतात. तर कोरोना संसर्ग केवळ फुफ्फुसावरच नाही तर संपूर्ण शरीरावर परिणाम करत असल्याचे डॉक्टर भोंडवे यांनी सांगितले.

दारू पिणे, सिगारेट अशा व्यसनांपासून दूर राहा. फिजिओथेरपी घ्या, वाफ घ्या, योग्य व्यायाम करा, योगा करा, नियमित ऑक्सिमीटर ने ऑक्सिजन तपासणी करा, रोज चाला, घरात असाल तर चालण्याचा व्यायाम करा, योग्य सकस आहार, प्रथिनेयुक्त  अन्न घ्या. व्हिटॅमिन डि, डी3 आणि व्हिटॅमिन सी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या.

- डॉ. रमेश भारमल, संचालक, प्रमुख महापालिका रुग्णालये

कोरोना संसर्ग यकृतावर देखील परिणाम करू शकतो. त्यामुळे फुफ्फुस देखील आकुंचन पाऊ शकते. त्यामुळे फुफ्फुसासाठी आवश्यक व्यायाम करणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम केल्याने शरीराला आवश्यक ऑक्सिजन पुरवठा योग्य प्रमाणात होण्यास मदत होते.अशा लोकांनी गर्दीची ठिकाणे तसेच सार्वजनिक ठिकाणी फिरणे टाळावे.

कोरोना बाधित रुग्ण बरा होऊन घरी आल्यानंतर त्यांना पुन्हा कोरोना होणार नाही असे एखाद्याला वाटत असेल तर ते चुकीचे ठरेल. त्यांना स्वतःसाठी तसेच इतरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोनातून बरे झालेले रुग्ण पुन्हा बाधित होत असल्याचे अनेक देशांमध्ये समोर आले आहे असे ही डॉ भोंडवे नमूद करतात.

कोरोनामुक्त झालेला रुग्ण कोरोना विषाणूपासून पूर्णतः मुक्त झाला असे नाही. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर देखील शरीरात विषाणूंचे अस्तित्व असू शकते. त्यामुळे रुग्णांना सकस आहार घेणे , आवश्यक योग आणि व्यायामावर भर देणे आवश्यक आहे.

आपण घरी असाल तर घरातील वस्तूंना नियमितपणे निर्जंतुकीकरण करा. असे केल्यावर आपला चेहरा, नाक किंवा डोळे स्पर्श करणे टाळा आणि ताबडतोब आपले हात धुवा.आठवड्यातून एकदा तुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनला डिसइन्फेटिंग वाइप्सने साफ करा. या वाइप्समुळे मोबाईलच्या वरील भागावरील किटाणू मरतात. 

( संपादन - सुमित बागुल ) 

many covid19 recovered patients are not developing antibodies things to take care after recovering from corona

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.