Navi Mumbai: वाहतुकीची कोंडी कायम; लाखो रुपयांचे सिग्नल केवळ 'शो' चे

सिग्नल यंत्रणा निष्क्रिय; वाढत्या वाहतुकीच्या कोंडीवर नियंत्रणाचे प्रश्नचिन्ह
Navi Mumbai traffic
Navi Mumbai traffic sakal
Updated on

Navi Mumbai: कळंबोली,कामेठा व खांदेश्वर सिडको वसाहतीतील लाखो रुपये खर्च करून वाहतुक व्यवस्था नियंत्रित ठेवण्यासाठी सिडकोने वसाहतीमधील जवळपास आठ ते दहा चौकात सिग्नल लावले.

मात्र अनेक वर्षापासून हे सिग्नल सुरुच नाहीत. केवळ नावापुरतेच सिग्नल लावण्यात आले असून शहरातील प्रत्येक चौकात दररोज वाहतुकीची कोंडी होते.

Navi Mumbai traffic
Navi Mumbai: खारघरमध्ये दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा, रोगराईचा धोका

सामाजिक कार्यकर्ते व विविध सामाजिक संघटनांनी वेळोवेळी अंदोलने व पत्रव्यवहार करून प्रशासनाकडून सिग्नल व्यवस्था सुरू करूवून घेतली.

मात्र उद्घाटन झाल्याच्या काही दिवसात ही यंत्रणा बंद पडल्याने त्याचा कुठलाही ऊपयोग झाला नसून संबंधित विभागाचा लाखो रुपयांचा चुराडा झाला आहे. या त्या मुळेच सध्या प्रशाक असलेली पालिका व नवी मुंबई वाहतूक विभाग या कडे वक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कळंबोली व खारघर शहरात सायन पनवेल हायवेवरील चौक ,कामोठा पोलिस ठाणे चौक, कळंबोली येथील पोलिस निवारा चौक व खांदेश्वर येथील रेल्वेपुलाचा चौक हे मुख्य चौक आहे. याच चौकात मुख्य बाजारपेठ असून अनेक कपड्यांची दुकाने, मेडिकल, किराणा, भाजीपाला व इतर महत्त्वाची दुकाने असल्यामुळे खरेदीसाठी ग्रामीण भागातील नागरिकांसह शहरवासीयांची दररोजच गर्दी होते.

Navi Mumbai traffic
Navi Mumbai Crime: अब पत्ताभी नही हिलेगा; गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर

यासोबतच इतरही चौकात दररोज वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे शहरात सिग्नल व्यवस्थेची मागणी होत होती. त्या अनुषंगानेच सिडकोने लाखो रुपये खर्चुन सिग्नल लावले. रस्त्यावर चारही बार्जुना झेब्रा क्रॉसिंगच्या पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आल्या होत्या. सुरुवातीला काही दिवस सिग्नल लागलेले दिसून आले. परंतु दोन ते तिन वर्ष उलटून गेले तरी अद्यापही शहरातील कोणत्याच चौकात सिग्नल व्यवस्था सुरळीत सुरू झालेली नाही. बहुतांश चौकात वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी काही ठराविक काळापर्यतच दिसतात. तसेच कळंबोली खांदेश्वर व कामोठा येथील चौकातून अवजड वाहतुक होत असल्याने देखील वाहतुक विस्कळीत होते व सकाळी व संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

Navi Mumbai traffic
Navi Mumbai: पालिकेच्‍या तिजोरीत अडीज कोटीहून अधिक मालमत्ता कर जमा

तसेच या ठिकाणच्या व्यापाऱ्यांकडे अवजड वाहनातून आलेल्या मालाच्या गाड्या देखील रस्त्याच्या कडेला उभ्या राहतात. दुकानदार दकानाबाहेरची जागा अडवून ठेवतात. त्यातच हातगाडे, अशा गदारोळात गाडयांचे पार्कींग होत असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो.त्या मुळेचदिवसेंदिवस वसाहतीमधील वाहतुकीची समस्या कमी होण्याएऐवजी जटील होत चालली आहे. त्यामुळे अनेकवेळा

किरकोळ अपघतही होत आहेत. शहरात वाहतूक शाखेचे कर्मचारी नित्यनेमाने सेवा बजावित आहेत. तरी लाखो रूपये खर्च करून लावलेली सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

Navi Mumbai traffic
Navi Mumbai Crime: घरफोडी करणाऱया सराईत दुक्कलीला पोलिसांनी केली अटक!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.