मुंबई : महाराष्ट्रात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होतंय. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाकडून आंदोलनाचा इशारा देण्यास आला आहे. त्यामुळे मुंबईच्या वेशीवर मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या मराठा आंदोलकांना रोखण्यासाठी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गासमोर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मुंबईचा एंट्री पॉईंट कळंबोलीतही मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अनेक गाड्यांची तपासणी करून त्यांना पुढे सोडलं जातंय त्यामुळे वाहतूक देखील संथ गतीने सुरु आहे.
महत्त्वाची बातमी : आजपासून मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये होणार वाढ; मुंबईकरांना मिळणार दिलासा
आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. यानिमित्ताने मराठा समन्वयक संघटनांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा दिलाय. म्हणूनच मुंबईच्या वेशीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा आणि कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतोय.
मुंबई आणि ठाण्यामधील आनंदनगर टोल नाक्यावर बाहेर गावावरून येणाऱ्या गाड्यांची तपासणी केली जात आहे. कुणीही मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने जाऊ नये याची खबरदारी घेतली जातेय. एकीकडे मुंबईतील आझाद मैदानात देखील मराठा समाजाकडून आंदोलन सुरु आहे. मराठा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आझाद मैदानानावर यावं आणि आंदोलन तीव्र करावं अशी हाक दिली होती.
या पार्श्वभूमीवर बाहेर गावचे आंदोलक मोठ्या प्रमाणात मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. अशा सर्व आनंदोलकांना मुंबईच्या वेशीवर अडवलं जाते आहे. हे आंदोलन अधिक तीव्र होऊ नये म्हणून मुंबई पोलिस खबरदारी घेताना पाहायला मिळतायत.
maratha agitation for reservation agitators may use farmers protest pattern for reservation
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.