Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवा; वडेट्टीवारांची मागणी

संसदेच्या विशेष अधिवेशनातही यावर चर्चा व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Maratha Reservation Protest
Maratha Reservation Protest
Updated on

मुंबई : जालन्यातील लाठीचार्जनंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. त्याचबरोबर संसदेच्या विशेष अधिवेशनातही याची चर्चा व्हावी, असं त्यांनी म्हटलं आहे. (Maratha Reservation Call special session of Legislature for Maratha Reservation LoP Vijay Wadettivar demanded)

Maratha Reservation Protest
Maratha Reservation: फडणवीसांचा जरांगेंशी फोनवरुन संवाद, दिला चर्चेचा प्रस्ताव; CM शिंदेही संवाद साधणार

वडेट्टीवार म्हणाले, "मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत तसेच पोलिसांवर निष्पक्ष कारवाई व्हावी. आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावून एकमतानं महाराष्ट्राच्या विधानसभेत ठराव मंजुर करून केंद्राकडं पाठवावा. तसेच संसदेचं विशेष अधिवेशन १८ ते २२ तारखेपर्यंत असणार आहे, त्यात एक दिवस वाढवून मराठा समाजाला १२ ते १५ टक्के आरक्षण वाढवून द्यावं"

Maratha Reservation Protest
Mumbai Air Hostess Murder: मुंबईत 23 वर्षीय एअर होस्टेसची गळा चिरुन निर्घृण हत्या!

ओबीसींचं आरक्षण वाढवावं

अनेकांच्या भूमिका वेगळ्या असू शकतात. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशीही मागणी मराठवाड्यातून होत आहे. त्यामुळं ओबीसींचं आरक्षण वाढवून त्यात मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं. (Latest Marathi News)

कारण महाराष्ट्रात ५२ टक्के ओबीसी आणि २६ टक्के मराठा समाज गृहित धरला तरी ही लोकसंख्या ७६ टक्क्यांवर जात असेल आणि आरक्षण तितकंच असेल तर समाधान कोणाचचं होणार नाही. यामधून खुल्या प्रवर्गाचा जास्त फायदा होईल. कारण ईडब्ल्यूएसचं १० टक्के आणि खुल्या प्रवर्गाला वेगळा कोटा मिळतो. त्यामुळं खुला प्रवर्गालाच जास्त आरक्षण मिळेल, आपल्या पदरात काहीच पडणार नाही.

तलाठी परीक्षा पुढे ढकलावी

मराठा आरक्षणाबाबत विविध ठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे, त्यातच आजच तलाठी भरती परीक्षा होत आहे. पण या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना समोरं जाव लागत आहे, त्यामुळं ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणीही यावेळी वडेट्टीवार यांनी केली. (Marathi Tajya Batmya)

घराघरात भांडणं लावण्यात भाजप पटाईत

बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या लोकसभा लढवणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत बोलताना वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला. "भाजप घराघरात भांडणं लावण्यात पटाईत आहे. याचे परिणाम पुढच्या काळात पहायला मिळणार आहेत. इंग्रजांकडून ट्रेनिंग घेतलेली मंडळी आहेत ही. घराघरात फूट कशी पाडता येईल, याचाच ते विचार करत असतात, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.