Maratha Reservation: एक भुजबळ पाडल्यास १६० मराठा आमदार पाडू; प्रकाश शेंडगेंचा इशारा

मराठा नेत्यांच्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया देताना शेंडगेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Maratha Reservation: एक भुजबळ पाडल्यास १६० मराठा आमदार पाडू; प्रकाश शेंडगेंचा इशारा
Updated on

मुंबई : मराठा आरक्षणावरुन सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा-ओबीसी नेत्यांकडून एकमेकांविरोधात भूमिका घेतल्या जात आहेत. त्यातच आता काही मराठा नेत्यांनी ओबीसींची भूमिका मांडणाऱ्या मंत्री छगन भुजबळांना निवडणुकीत पाडण्याचं आवाहन केलं आहे. त्याला आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Maratha Reservation If one Chhagan Bhujbal is fall in Election 160 Maratha MLAs will be falled warning of Prakash Shendge)

Maratha Reservation: एक भुजबळ पाडल्यास १६० मराठा आमदार पाडू; प्रकाश शेंडगेंचा इशारा
Delhi Crime: बनावट डॉक्टर अन् 9 मृत्यू! दिल्लीतील उच्चभ्रू भागातील रॅकेट उद्ध्वस्त

...तर १६० मराठा आमदार पाडू

तुम्ही एक भुजबळ पाडला तर आम्ही १६० मराठा आमदार पाडू, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. ओबीसी समाजाची भूमिका घेणारे मंत्री छगन भुजबळ मराठा समाजानं मतदान करु नये असं आवाहन केलं जात आहे. यापार्श्वभूमीवर प्रकाश शेंडगे यांनी हा इशारा दिला आहे. (Latest Marathi News)

Maratha Reservation: एक भुजबळ पाडल्यास १६० मराठा आमदार पाडू; प्रकाश शेंडगेंचा इशारा
Delhi Crime: बनावट डॉक्टर अन् 9 मृत्यू! दिल्लीतील उच्चभ्रू भागातील रॅकेट उद्ध्वस्त

महाराष्ट्रात ओबीसी समाज ६० टक्के

प्रकाश शेंडगेंनी म्हटलं की, "ओबीसींसाठी लढणाऱ्या भुजबळांना पाडू अशा प्रकारची भाषा जर महाराष्ट्रात सुरु झाली तर मग ओबीसी समाज महाराष्ट्रात ६० टक्के आहे. प्रत्येक मतदारसंघात तो येतो. त्यामुळं जर छगन भुजबळांना जर तुम्ही पाडलंत तर मग हे सर्व ओबीसी १६० मराठा आमदार पाडल्याशिवाय राहणार नाहीत" (Marathi Tajya Batmya)

Maratha Reservation: एक भुजबळ पाडल्यास १६० मराठा आमदार पाडू; प्रकाश शेंडगेंचा इशारा
Maratha Reservation: मराठ्यांच्या जागेवर लागलेल्यांना बाहेर काढून त्यांची संपत्ती जप्त करावी : मनोज जरांगे

उद्या जालन्यात ओबीसी नेत्यांची सभा

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी एकहाती लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांच्या बालेकिल्ल्यात अर्थात जालन्यात उद्या ओबीसी नेत्यांची जाहीर सभा पार पडणार आहे. 'आरक्षण बचाव एल्गार' या सभेमुळं जालन्यात राजकीय वातावरण चांगलंच तापणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.