Manoj Jarange: वाशी येथील शिवाजी चौकामध्ये मराठ्यांचा जनसागर! मनोज जरांगे पाटील जीआर वाचून दाखवणार

Manoj Jarange: वाशी येथील शिवाजी चौकामध्ये मराठ्यांचा जनसागर लोटला आहे. काही वेळातच मनोज जरांगे संवाद साधणार आहेत.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatileSakal
Updated on

वाशी येथील शिवाजी चौकामध्ये मनोज जारांगे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून उपस्थित मराठा बांधवाना संबोधित करणार आहेत. यासाठी सकाळ पासूनच वाशी येथील शिवाजी चौकामध्ये मराठा समाजाचा जनसागर लोटला आहे. मनोज जारांगे पाटील काय संबोधित करणार आहे. याकडे मराठा बांधवाचे लक्ष लागून राहिले आहे. तर आता दुपारी उन्हाची तीव्रता वाढू लागली असताना देखील मराठा बांधव मोठ्या उत्साहात घोषणाबाजी देत जरांगे पाटील यांची आतुरतेने वाट पाहत आहे.

आज सरकारच्या शिष्टमंडळासोबतची बैठक संपन्न झाल्यानंर मनोज जरांगे पाटील यांनी बाहेर येऊन सर्व आंदोलकांना शिवाजी चौकात जमा होण्यास सांगितले आहे, शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर जो काही निर्णय घ्यायचा आहे तो सर्व मराठा बांधवांशी चर्चा करूनच घेतला जाईल असं जरांगे पाटलांनी म्हटलं आहे. सर्व मराठा आंदोलक शिवाजी चौकाकडे रवाना झाले आहेत.

Manoj Jarange Patil
Republic Day Parade 2024: दिल्लीच्या कर्तव्य पथावर झळकले माँसाहेब आणि बाल शिवबा; प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ

शिवाजी चौक मराठा आंदोलकांनी फुलून गेला आहे. मनोज जरांगे यांनी शिष्टमंडळाशी काय चर्चा केली त्यानंतर ते कोणती भूमिका घेणार याकडे मराठा समाजासह राज्याचं लक्ष लागलं आहे. राज्याच्या शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर मनोज जरांगे कोणती भूमिका घेणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे. ते काही वेळातच जीआर देखील वाचून दाखवणार आहेत.

Manoj Jarange Patil
Maratha Reservation: मराठा आंदोलनाचा आज निर्णायक दिवस! मुख्यमंत्री स्वत: जरांगेंना भेटून तोडगा काढणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()